Dharma Production: एनसीबीचा धर्मा प्रॉडक्शनच्या क्षितिज प्रसादला दणका!

बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनमध्ये असणाऱ्या क्षितिज प्रसादला आता एनसीबीनं कोर्टात दणका दिला आहे.
NCB News Releted Dharma Production
NCB News Releted Dharma Productionesakal

Karan Johar Dharma Production: बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनमध्ये असणाऱ्या क्षितिज प्रसादला आता एनसीबीनं कोर्टात दणका दिला आहे. धर्मा प्रॉडक्शनच्या काही कर्मचाऱ्यांवर ड्रग्ज प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले होते. ते गुन्हे मागे घेण्याविषयीची मागणी करण्यात आली होती. त्या मागणीवर एनसीबीनं आक्षेप घेतल्याचे दिसुन आले आहे. क्षितिज प्रसादकडून ही याचिका दाखल करण्यात आली होती. धर्मा प्रॉडक्शनवर अंमली पदार्थांच्या डिलिंगमध्ये सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला होता.

बॉलीवूडमधील सर्वात मोठे प्रॉडक्शन हाऊस म्हणून करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनकडे पाहिले जाते. मोठमोठ्या बॅनरचे चित्रपट या प्रॉडक्शन हाऊसनं तयार केले आहेत. प्रसाद हे धर्मा प्रॉडक्शनमध्ये काम करत होते. त्यांना सप्टेंबर 2020 मध्ये अंमली पदार्थांची तस्करी आणि त्याच्या डिलिंगमध्ये सहभागी झाल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या घटनेपासून चर्चेत आले आहे.

NCB News Releted Dharma Production
NCB नं क्लीन चीट दिल्यावर आर्यन खानचा क्लबमधील 'तो' Video Viral, चर्चा सुरू

प्रसादला कालांतरानं याप्रकरणात जामीनही मिळाला. मात्र त्यानं आता आपल्यावरील गुन्हे मागे घ्यावेत अशी एक याचिका कोर्टाकडे केली होती. त्यावर एनसीबीनं आक्षेप घेतल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त इ टाईम्समध्ये प्रसिद्ध झाले आहे. यावेळी प्रसिद्ध वकील निखिल मानशिंदे यांनी त्यांची बाजू कोर्टात मांडली होती. प्रसाद हा निर्दोष असून त्याला या प्रकरणात जाणीवपूर्वक गोवण्यात आल्याचा युक्तिवाद करण्यात आला होता. मात्र आता प्रसादनं आपल्यावरील गुन्हे मागे घ्यावेत या याचिकेवर एनसीबीनं विरोध दर्शवला आहे.

NCB News Releted Dharma Production
Richa Chadha : 'मेहंदी लगा के रखना...' रिचाच्या हातावर अलीचं नाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com