आराध्याने कोरोना योद्धांसाठी काढलं हे खास चित्र, ऐश्वर्या आणि बिग बींनी केला फोटो शेअर

aaradhya
aaradhya
Updated on

मुंबई- कोरोना व्हायरस विरुद्ध  संपूर्ण जग या ना त्या प्रकारे लढत आहे. मात्र या लढाईत सर्वात मोलाचा वाटा आहे तो म्हणजे डॉक्टर, नर्स, पोलिस, सफाई कामगार यांचा..आपलं कुटुंब आणि वैयक्तिक आयुष्य एका बाजुला ठेवून हे योद्धे देशाला कोरोनामुक्त करण्यासाठी धडपडत आहेत. सगळेच जण त्यांच्या मेहनतीला सलाम करत आहेत. यादरम्यान लहान मुलांमध्ये देखील समजुतदारपणा दिसून येतोय. बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चनची मुलगी आराध्या बच्चननेही कोरोना योद्धांचे आभार मानले आहेत. 

नुकतंच ऐश्वर्याने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो पोस्ट केला आहे. तिने डॉक्टर, नर्स, पोलिस, शिक्षक आणि कोरोना व्हायरसच्या त्या योद्धांना धन्यवाद दिले आहेत जे या लढाईत स्वतःचं आयुष्य पणाला लावून दिवसरात्र मेहनत करत आहेत. आराध्याने या चित्रामध्ये सफाई कामगार, डॉक्टर, नर्स, पोलिस, सैनिक, रिपोर्टर, शिक्षक यांचं चित्र रेखाटलं आहे. या चित्रामध्ये एक हँड सॅनिटायझर आणि साबण देखील दिसून येतोय. या चित्रात हात जोडून नमस्कार केल्याचं चित्र आहे ज्यावर लिहिलंय, थँक्यु- धन्यवाद.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

my darling Aaradhya’s Gratitude and Love

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

या चित्राच्या खालच्या बाजुला पाहिलं तर यात आराध्याने एक घर रेखाटलं आहे ज्यात ती तिच्या आई वडिलांचा हात पकडून उभी आहे. यासोबतंच त्यावर सुरक्षित राहा, घरात राहा असं लिहिलं आहे. ऐश्वर्याने आराध्याचं हे चित्र पोस्ट करत लिहिलं आहे. 'माझ्या गोड आराध्याकडून आभार आणि प्रेम.'

तर अमिताभ यांनी देखील आराध्याचं हे चित्र पोस्ट केलंय. ते लिहितात, 'तुला जाणवतं, तुला समजतं, तुला व्यक्त होता येतं जरी तु केवळ ८ वर्षांची असलीस तरी. हे चित्र माझी नात आराध्याने काढलं आहे.'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

... you feel .. you understand .. you express .. even if you are an 8 yr old .. .. this by grand daughter Aaradhya ..

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) on

aishwarya shares a drawing made by aaradhya to show her gratitude to coronavirus fighters

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com