देवासाठी अजय देवगणने केला या 'तीन' गोष्टींचा त्याग

अभिनेता नुकताच सबरीमाला मंदीराची यात्रा पूर्ण करून आला आहे.
Ajay Devgan
Ajay DevganGoogle
Updated on

एखादा अभिनेता मद्यप्राशन किंवा धुम्रपान करत नसेल हे फार क्वचितच ऐकायला मिळते. अन्यथा एखाद्या पार्टीच्या निमित्ताने जी कलाकारांच्या आयुष्यात बऱ्याचदा रोजच असते त्यानिमित्तानं मद्यप्राशन,धुम्रपान करणं हे सवयीचा भाग होऊन बसतं. त्यात अजय देवगणच्या(Ajay Devgan) बाबतीत तर ही बातमी समोर आलीय की त्याला पाच-पाच मिनिटाला धुम्रपान शुटिंगच्या सेटवरही करायची सवय आहे. अजयची प्रत्यक्ष मुलाखत करण्याआधी मला एक पत्रकार म्हणून यात फार तथ्य वाटत नव्हतं. इतकं कोण धु्म्रपान करत असेल .पण सिंघम सिनेमाच्या निमित्तानं त्याची केलेली दीर्घ मुलाखत घेताना त्याच्या धु्म्रपानाच्या त्या सवयीचा जवळून अनुभव आला आणि त्यावर विश्वास बसला. पण अशा अजय देवगणने सबरीमाला मंदिराला भेट दिल्यावर दारू,सिगारेट आणि परफ्युमचा त्याग केला ही गोष्ट जेव्हा कानावर आली तेव्हा मात्र देव आहे यावर १०० पेक्षा अधिक टक्के विश्वास ठाम झाला. काय आहे प्रकरण? सविस्तर वाचा.

Ajay Devgan At Sabrimala temple
Ajay Devgan At Sabrimala templeGoogle

सबरीमाला मंदिरात दर्शनासाठी पालखीतून चाललेला अभिनेता अजय देवगण. हा फोटो पोस्ट झाल्यावर अजयला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं गेलंय.

नुकताच अजय देवगण सबरीमाला मंदिराला(Sabrimala Temple) भेट देऊन आला. तिथे त्यानं म्हणे तब्बल अकरा दिवस पूजा अर्चना केली. त्यानं मंदिराचे,देवाच्या पूजेसंदर्भातले सगळे कडक नियम पाळले म्हणे. त्याने काळी वस्त्र परिधान केली, तो अकरा दिवस मऊ गादीवर न झोपता चटईवर झोपला,अनवाणी वावरला,मांसाहार केला नाही,इतकंच काय तर पुजेत विघ्न येऊ नये म्हणून त्याने मद्यप्राशन,धु्म्रपान सोडलं आणि परफ्युमचाही त्याग केला. पण देवासाठी इतकं सगळं करूनही सबरीमाला मंदिरात जाताना तिथपर्यंतचा प्रवास त्यानं पालखीतून केला म्हणून त्याला ट्रोलर्सनी चांगलंच धारेवर धरलंय. ट्रोलर्सचं म्हणणं आहे,'इतका मोठा अ्ॅक्शन हिरो म्हणवतो अन् दवदर्शनाला चालत जाता येत नाही'. या आणि अशा अनेक तिखट प्रतिक्रिया अजयच्या त्या पालखीतील फोटोवर ट्रोलर्सनी दिल्या आहेत. अजय देवगणच्या टीमनं त्यावर उत्तरादाखल म्हटलं आहे की, 'अभिनेत्याला काही शारिरीक व्याधींचा त्रास होत होता म्हणून पालखीतून प्रवास केला'. काहीही असो पण 'चैन स्मोकर' हा इंग्रजाळलेला शब्द अजयच्या बाबतीत परफेक्ट बसत असताना केवळ देवासाठी अकरा दिवस त्यानं धुम्रपानच नाही तर कुठलच व्यसन केलं नाही ही खुप मोठी गोष्ट आहे. हाच निर्णय जर त्यानं आजन्मासाठी घेतला तर ब्रेकिंग न्यूजच होईल ती,नाही का.

Ajay Devgan
सुशांत सिंग राजपुतबाबत आज त्याच्या वाढदिवशी मोठा खुलासा समोर...

ट्रोलर्सचं म्हणणं आहे,इतका मोठा अ्ॅक्शन हिरो म्हणवतो अन् दवदर्शनाला चालत जाता येत नाही. या आणि अशा अनेक तिखट प्रतिक्रिया अजयच्या त्या पालखीतील फोटोवर ट्रोलर्सनी दिल्या आहेत. अजय देवगणच्या टीमनं त्यावर उत्तरादाखल म्हटलं आहे की अभिनेत्याला काही शारिरीक व्याधींचा त्रास होत होता म्हणून पालखीतून प्रवास केला. काहीही असो पण चैन स्मोकर हा इंग्रजाळलेला शब्द अजयच्या बाबतीत परफेक्ट बसत असताना केवळ देवासाठी अकरा दिवस त्यानं धुम्रपानच नाही तर कुठलच व्यसन केलं नाही ही खुप मोठी गोष्ट आहे. हाच निर्णय जर त्यानं आजन्मासाठी घेतला तर ब्रेकिंग न्यूजच होईल ती,नाही का.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com