हे तर रिअल हिरो, मुंबईमधील 'या' भागासाठी अजय देवगण बनला देवमाणुस

ajay
ajay

मुंबई : ऍक्शन, कॉमेडी, ड्रामा, रोमान्स असं सारं काही प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी कलाकार मंडळी करत असतात. एखादा विषय अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवायचा असेल तर चित्रपट हे प्रभावी माध्यम आहे असे आपण कायम म्हणत आलो आहेत. शिवाय प्रत्येक विषय योग्य पद्धतीने रुपेरी पडद्यावर सादर करायचं काम कलाकार करतात. सतत लाईम लाईट, चंदेरी, ग्लॅमरस दुनियेत राहणारी ही मंडळी खऱ्या आयुष्यात नेमकी कशी बरं असतील असा प्रश्न कायम सगळ्यांना असतो. खऱ्या आयुष्यात देखील ही कलाकार मंडळी हळवी, दानशुर, प्रेमळ असतील का असा विचार प्रत्येकाच्या मनात आला असणारच. 

पण खरंच नेहमीच चेहऱ्यावर रंगरंगोटी करुन फिरणारे हे कलाकार खऱ्या आयुष्यात काही वेगळेच आहेत. हे सिद्ध झालंय ते सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे. कलाकार मंडळी दानुशरही असतात का? या प्रश्नाचं उत्तर बहुदा आज सगळ्यांना मिळालं आहे. सोनु सूद, अक्षय कुमार, सलमान खान, शाहरुख खान या बड्या मंडळींसह बरेच कलाकार कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये उतरले आणि आजही ते सढळ हाताने मदत करत आहेत. हे खरंच रिअल हिरो आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 

बॉलिवूडचा सिंघम म्हणजेच अजय देवगणवर आजवर साऱ्यांनीच एक अभिनेता म्हणून प्रेम केलं. पण आता सामान्य लोकांसाठी तो खरा हिरो बनला आहे. अजयने धारावीतील 700 कुटुंबियांची जबाबदारी घेतली आहे. धारावीमध्ये कोरोना काही थांबयचं नाव घेत नाही. धारावीमध्ये काही लोकांना कोरोनामुळे आपला जीव देखील गमवावा लागला आहे. अशामध्ये येथील गरजू लोकांच्या मदतीसाठी अजय धावून आला आहे. अजयने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. तसेच इतरांनीही मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. 'धारावी येथे कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत.

अशामध्ये एसीजीएम (म्युनसिपल कॉर्पोरेशन ऑफ ग्रेटर मुंबई) येथे जीवाजी बाजी लावून काम करत आहे. तसेच काही एनजीओ देखील येथील लोकांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. आम्ही धारावीतील 700 कुटुंबियांची जबाबदारी घेतली आहे. रेशन किट आणि इतर आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त वस्तु पुरवत आहोत. मी तुम्हाला  विनंती करतो की इतरांनाही या मदतीसाठी पुढे येऊन दान करावं.' असे अजयने ट्विट केले आहे. धारावीतील कोरोनाच्या रुग्णसंख्येने दीड हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तसेच हा भाग दाटीवाटीचा असल्याने तेथील लोकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्नच आहे. सरकार आपल्या परीने येथील कोरोनाची रुग्णसंख्या कमी करण्याचा प्रयत्न करत आहेच. पण त्याचबरोबरीने आता अजयही येथील गरजूंच्या मदतीसाठी रिंगणात उतरला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com