अजय देवगणने बेकायदेशीर ऍपवरुन मेसेज करत अमिताभ बच्चन यांना असं केलं होतं हैराण...

दिपाली राणे-म्हात्रे
Monday, 11 January 2021

अजय देवगण बॉलीवूडच्या त्या काही व्यक्तींमधील आहे जो बिग बी यांच्यासोबत प्रँक करुन त्यांना वर्षानुवर्षे या मस्करीबाबत काही सांगत देखील नाही.

मुंबई- बॉलीवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन यांच्यासोबत मजामस्करी करताना एखादी व्यक्ती हजारवेळा विचार करेल. मात्र अभिनेता अजय देवगण बॉलीवूडच्या त्या काही व्यक्तींमधील आहे जो बिग बी यांच्यासोबत प्रँक करुन त्यांना वर्षानुवर्षे या मस्करीबाबत काही सांगत देखील नाही. याबाबतचा खुलासा अजय देवगणने नुकताच 'द कपिल शर्मा शो'मध्ये केला आहे. 

हे ही वाचा: आगामी रोमँटिक-कॉमेडी सिनेमात 'हे' दोन कलाकार साकारणार रणबीर कपूरच्या आई-वडिलांची भूमिका  

अजय देवगणने हा किस्सा द कपिल शर्मा शोमध्ये शेअर केला की कशा प्रकारे त्याने बेकायदेशीर ऍपचा वापर करत अमिताभ बच्चन यांना त्रास दिला होता. शोमध्ये सगळ्यात जास्त मस्तीखोर आणि प्रँक करणा-या अभिनेत्याबाबत चर्चा होत होती ज्यावर अभिषेक म्हणाला सगळ्यात जास्त प्रँक अजय करतो आणि बाबांसोबत असं कोणीही करत नाही मात्र अजय इंडस्ट्रीतील त्या काही लोकांमधील आहे जो त्यांच्यासोबत प्रँक देखील करतो आणि बाबांना तो आवडतो देखील.

यावर अजय म्हणाला की एकदा त्याने एका मोबाईल ऍपचा वापर करत  बिग बी यांना त्रास दिला होता. मात्र आता हे ऍप भारतात बॅन आहे. या ऍपच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलवरुनंच कोणा दुस-याच्या नंबरने मेसेज पाठवू शकता. या ऍपच्या माध्यमातून अजयने त्याच्या स्वतःच्या फोनमधून अमिताभ बच्चन यांच्या नंबरचा वापर करुन त्यांच्या जनसंपर्क अधिका-याला सकाळी ६ वाजता त्यांच्या घरी येण्याचा मेसेज केला होता. त्याला वाटलं की हा अमिताभ यांच्यानंबरुन आलेला मेसेज आहे त्यामुळे तो सकाळी ६ वाजता बच्चन यांच्या घरी पोहोचला. मात्र बिग बी त्याला एवढ्या लवकर आलेलं पाहून ओरडायला लागले की मी तुम्हाला बोलवलं नाही तर मग तुम्ही एवढ्या लवकर कसे आलात ते पण सकाळी सकाळी. 

अजयने हे देखील सांगितलं की बिग बींना त्याने ही गोष्ट खूप वर्षांनंतर 'केबीसी'च्या सेटवर सगळ्या प्रेक्षकांमध्ये सांगितली होती आणि तेव्हा त्यांना ही गोष्ट माहित नव्हती. अभिषेकने सांगितलं की अजय सिनेमाच्या सेटवर सगळ्यात जास्त प्रँक करतो आणि अनेकांना हैराण करतो.   

ajay devgan sent messages from illegal app to pranked amitabh bachchan kapil sharma  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ajay devgan sent messages from illegal app to pranked amitabh bachchan kapil sharma