बॉलिवूडच्या 'सिंघम'ची मुंबई पोलिसांसोबत काम करण्याची तयारी

ajay
ajay

मुंबई- कोरोना विरुद्धची लढाई दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. डॉक्टर, नर्स, पोलिस रात्रंदिवस मेहनत करत आहेत. शिवाय राज्य तसेच केंद्र सरकारही कोरोनाला हरविण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत. डॉक्टर, नर्स, पोलिस आपल्या कुटुंबियांपासून दुर राहून जीवाची पर्वा न करता जनतेसाठी काम करत आहे. जगभरातून त्यांच्या या कामाचं कौतुक होत आहे. कलाकार मंडळीदेखील आपल्या या रक्षकांच वारंवार सोशल मीडियाद्वारे कौतुक तसेच आभार व्यक्त करत आहेत. बॉलिवूडचा सिंघम म्हणजेच अजय देवगणने तर मुंबई पोलिसांबरोबर काम करण्याची तयारी दर्शवली आहे. अजयने ट्विट करत मुंबई पोलिसांचं भरभरुन कौतुक केलं आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चांगलच गाजत आहे.

अजयने ट्वीट करत लिहिलंय, 'प्रिय मुंबई पोलिस, जगात सगळ्यात चांगल काम करणाऱ्यांपैकी तुम्ही एक आहात. कोरोनाविरुद्धच्या लढाईत तुम्ही जे काम करत आहात. ते खरंच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा हा सिंघम खाकी वर्दी घालून तुमच्याबरोबर तुमच्या जोडीनं रस्त्यावर उतरुन काम करण्यास तयार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र` असे ट्विट अजयने केले आहे. बॉलिवूडचा हा दिलदार सिंघम आपल्या परिने हवी ती मदत करायला तयार झाला आहे. अजयने पोलिसांबरोबर काम करण्याची दाखवलेली तयारी खरंच कौतुकास्पद आहे. 

मुंबई पोलिस यांनी त्यांचा काम करतानाचा व्हिडिओ नुकताच ट्विटरवर शेअर केला होता. हा व्हिडिओ अजयनेही रिट्विट केला होता. अजयच्या या ट्विटला मुंबई पोलिसांनी उत्तर देखील दिलं होतं. 'सध्याची परिस्थिती पुर्वपदावर आणण्यासाठी खाकी वर्दीतील लोकांनी जे केलं पाहिजे तेच आम्ही करत आहोत.' असे मुंबई पोलिस यांनी म्हटले होते. 

अजयने आजवर खाकी वर्दी परीधान केली ती फक्त चित्रपटांसाठी. पण प्रत्यक्षात आता जनतेसाठी काम करण्याची त्याची इच्छा आहे. तसेच इतर सेलिब्रिटींप्रमाणे अजयही कोरोना विरुद्ध लढाईत आर्थिक मदत करण्यासाठी पुढे सरसावला आहे. त्याने पंतप्रधान तसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आर्थिक मदत केली आहे. तसेच फेडरेशन ऑफ वेस्टर्न सिने एम्पलॉईजला 51 लाख रुपयांची मदत केली आहे. 

Ajay devgan thanks mumbai police for their efforts in covid 19 pledges to support as singham  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com