व्हिडिओ: शकिरासारखी ठुमकताना दिसली अजय देवगणची लेक निसा, व्हिडिओची चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nysa devgan

निसाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये निसा तिच्या मैत्रीणींसोबत डान्स करताना दिसतेय. 

व्हिडिओ: शकिरासारखी ठुमकताना दिसली अजय देवगणची लेक निसा, व्हिडिओची चर्चा

मुंबई- अभिनेता-निर्माता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोलची मुलगी निसा देवगण सोशल मिडियावर चांगलीच ऍक्टीव्ह असते. नुकताच निसाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये निसा तिच्या मैत्रीणींसोबत डान्स करताना दिसतेय. 

हे ही वाचा: अनुष्काने शेअर केलेल्या फोटोमध्ये टुथब्रशने शूज साफ करताना दिसला विराट कोहली  

निसा देवगणचा हा व्हिडिओ इंस्टाग्राम फॅनपेजवरुन शेअर केला गेला आहे. या व्हिडिओमध्ये अजय देवगणची लाडकी लेक जबरदस्त ठुमके लगावताना दिसत आहे. यात तीन मुली एकत्र डान्स करत आहेत. उजव्या साईडला नीसा डान्स करतेय. तिच्या डान्स स्टेप्स पाहुन चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत.

'स्टँड बाय मी' या गाण्यावर निसा आणि तिच्या मैत्रीणी डान्स करत आहेत. या तिघींमध्ये निसाचे ठुमके सगळ्यात जबरदस्त असल्याचं नेटीझन्सचं म्हणणं आहे. निसाची सोशल मिडियावर जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे.

निसा त्या स्टार किड्सपैकी एक आहे जे बॉलीवूडमध्ये एंट्री न करताही चर्चेत असतात. कित्येकदा सोशल मिडियावर निसा ट्रोल देखील होते. मात्र जेव्हा जेव्हा निसा ट्रोल होते तेव्हा तेव्हा तिचे वडिल आणि अभिनेता अजय देवगण तिच्यासोबत उभा राहतो  आणि तिला पाठिंबा देताना दिसतो.   

ajay devgn daughter nysa video of dancing and having some fun time with her friends  

loading image
go to top