कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर अभिषेक बच्चनला अजय देवगणने फोन करुन झापलं होतं, 'कपिल शर्मा'च्या शोमध्ये खुलासा

दिपाली राणे-म्हात्रे
Saturday, 9 January 2021

अभिषेक बच्चन सांगतो की जेव्हा तो कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला तेव्हा अजय देवगणचा त्याला फोन आला होता आणि अजयने फोनवरंच अभिषेकला सुनावलं होतं.

मुंबई- कोरोना व्हायरसचा कहर देशभरात पाहायला मिळाला. बॉलीवूडमध्ये देखील त्याचा परिणाम दिसून आला. बॉलीवूडमधील सगळ्यात जास्त चर्चेत असलेलं कोरोनाचं प्रकरण होतं ते म्हणजे बच्चन कुटुंबाचं. जुलै महिन्यात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले होते. आता नुकताच अभिषेक बच्चनने खुलासा केला आहे की जेव्हा तो कोरोना पॉझिटीव्ह आला होता तेव्हा अजय देवगणने त्याला चांगलंच झापलं होतं. 

बिग बॉस १४: रश्मी देसाईकडून झाली मोठी चूक, सगळ्यांसमोर मागावी लागली सोनाली फोगट यांची माफी  

अभिषेक बच्चन आणि अजय देवगण लवकरच 'कपिल शर्मा शो'मध्ये दिसून येणार आहेत या शोचा एक प्रोमो व्हिडिओ वाहिनीने त्यांच्या अधिकृत सोशल मिडियावरुन शेअर केला आहे. या व्हिडिओ क्लीपमध्ये अभिषेक बच्चन सांगतो की जेव्हा तो कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला तेव्हा अजय देवगणचा त्याला फोन आला होता आणि अजयने फोनवरंच अभिषेकला सुनावलं होतं.

अभिषेक बच्चनने या दरम्यान अक्षरश: अभिनय करत सांगितलं. त्याने कपिल शर्माला अभिषेक म्हणून बोलायला सांगितलं आणि स्वतः अजय देवगण बनला. त्याने सांगितलं की कोरोना संक्रमित झाल्यानंतर सगळ्यात पहिला फोन त्याला अजय देवगणचाच आला. अजयने त्याला ओरडत विचारलं की हे काय झालं? कसं झालं? यानंतर अभिषेक जोरजोरात हसत म्हणाला की नंतर त्याच्या ही गोष्ट लक्षात आली की अजय देवगण काही दिवसांपूर्वीच त्याला भेटला होता. हे ऐकून तिने उपस्थित असलेल्या सगळ्यांना हसू फुटतं.

या शोमध्ये अजय देवगण आणि अभिषेक बच्चनसोबत सोहम शाह आणि अभिनेत्री निकिता दत्ता देखील होते. यादरम्यान सगळ्यांनीच खूप चर्चा आणि मस्ती केली. अभिषेक आणि अजय या शोमध्ये त्यांच्या आगामी 'द बिग बुल'च्या प्रमोशनसाठी आले होते. अभिषेक या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे तर अजय देवगण याचा निर्माता आहे. हा सिनेमा हर्षद मेहता स्कॅमवर आधारित आहे. हर्षद मेहताच्याच मुख्य भूमिकेत अभिषेक झळकणार आहे.   

ajay devgn scolded abhishek bachchan on phone call after being corona positive reveals in the kapil sharma show  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ajay devgn scolded abhishek bachchan on phone call after being corona positive reveals in the kapil sharma show