
रश्मी देसाईला बिग बॉसच्या घरात जाणं महागात पडलं आहे आणि तिला सगळ्यांसमोर सोनाली फोगाट यांची माफी मागायला लागली आहे.
मुंबई- 'बिग बॉस'मध्ये सध्या सगळ्यांचा आवडता क्षण म्हणजेच फॅमिली वीक सुरु आहे. जिथे शोमधील स्पर्धकांना भेटायला त्यांच्या कुटुंबातील सदस्य आले होते. मात्र कौटुंबिक तणावामुळे विकास गुप्ताला भेटायला त्याच्या घरातून कोणीही येऊ शकलं नाही. ज्यामध्ये बिग बॉस १३ ची स्पर्धक आणि टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाई विकासला भेटायला पोहोचली. तिने घरात जाऊन विकास गुप्ताचा उत्साह वाढवला आणि त्याच्या गेमचं कौतुक केलं. रश्मिला घरात आलेलं पाहुन विकास देखील खूप भावूक झाला आणि रडायला लागला ज्यावर रश्मी त्याला समजवण्याचा प्रयत्न करते.
बर्थ डे स्पेशल: १७ वर्षांनंतर फरहान अख्तरचा झाला होता घटस्फोट, आता करतोय 'या' अभिनेत्रीला डेट
ही गोष्ट वेगळी की आता रश्मी देसाईला 'बिग बॉस'च्या घरात जाणं महागात पडलं आहे आणि तिला सगळ्यांसमोर सोनाली फोगाट यांची माफी मागायला लागली आहे. त्याचं झालं असं की रश्मी देसाईला बिग बॉस घरातील नवीन कॅप्टन निवडण्याची संधी देतात. ज्यामध्ये रश्मी देसाईला सोनाली फोगट आणि राखी सावंतपैकी कोणा एकाचं नाव घ्यायचं होतं. तिथे रश्मी सोनाली फोगट यांचं नाव विसरते आणि राखी सावंतचं नाव कॅप्टन्सीसाठी घेते. मात्र रश्मीला सोनाली फोगटला कॅप्टन बनवायचं होतं.
M sorry @sonaliphogatbjp ji aapka naam nahi yaad tha. But mere shubhkamna aap ko ki aap aur aage badhe. Stay strong and happy
— Rashami Desai (@TheRashamiDesai) January 7, 2021
सोनाली फोगट यांचं नाव विसरल्याने त्यांचे चाहते रश्मी देसाईला ट्रोल करायला लागले. मात्र रश्मीने याबाबत माफी देखील मागितली.रश्मी देसाईला ट्रोलिंगमुळे सगळ्यांसमोर माफी मागावी लागली. तिने सोशल मिडियावर तिची ही चूक कबुल केली. रश्मीने ट्विटरवर सगळ्यांसमक्ष माफी मागत लिहिलंय, 'सोनाली जी मी तुमची माफी मागते. मी तुमचं नाव विसरले होते. मात्र माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत. तुम्ही अशाच पुढे जात राहा.'
tv bigg boss 14 rashami desai apologies to sonali phogat know the reason