Ajay Devgn: 'मला साक्षात 'दैवी शक्ती''...महाशिवरात्रीनिमीत्त अजयनं शेअर केला 'भोला'च्या सेटवरचा थरारक अनुभव.. Ajay Devgn shared pictures and experience of shooting at Ganga ghat special occasion of Mahashivratri post viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajay Devgn

Ajay Devgn: 'मला साक्षात 'दैवी शक्ती''...महाशिवरात्रीनिमीत्त अजयनं शेअर केला 'भोला'च्या सेटवरचा थरारक अनुभव..

Ajay Devgn: बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण सध्या त्याच्या आगामी 'भोला' चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याने या चित्रपटाचे पोस्टरही रिलिज केले आहे. या चित्रपटाच्या नावावरुनचं कळते की हा चित्रपटा भगवान महादेव यांच्याशी संबधीत आहे. त्याचबरोबर पोस्टरमध्येही अजय डमरु आणि त्रिशुल सोबत दिसत आहे.

या मोस्ट अवेटेड चित्रपटाच्या सर्व स्टार्सचा टीझर आणि फर्स्ट लूक आधीच खूप चर्चेत आला आहे. मात्र त्यातच महाशिवरात्रीच्या निमित्ताने अजयने सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबत अभिनेत्याने गंगा घाटावरील त्याचा शूटिंगचा अनुभवही चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

अजय देवगणने त्याच्या इंस्टा वर अनेक फोटो शेअर केले आहेत. यात अजय पांढर्‍या रंगाचे धोतर परिधान करून त्याचे ऍब्स फ्लॉंट करताना दिसत आहे. चित्रात तो शिवलिंगाला जल अर्पण करताना आणि पुजाऱ्यासोबत गंगा आरती करताना दिसत आहे. त्यांच्या पाठीमागेही भाविकांची मोठी गर्दीही दिसून येते. यात संपूर्ण गंगा घाटाचे चित्र आहे.

या फोटोसोबतच अजयच्या पोस्टच्या कॅप्शनने चाहत्यांचे लक्ष वेधलं आहे. त्याने लिहिलयं की, "कधीकधी एखादा दिग्दर्शक त्या 'एका'ची वाट पाहतो, ते म्हणजे अवास्तव, मंत्रमुग्ध करणाऱ्या फ्रेमची... आणि एक दिवस असे घडते. त्या दिवशी मी बनारसमध्ये महाआरतीच्या दृश्याचे शुटिंग करत असताना मला एक जबरदस्त जादू जाणवली. जे केवळ अनुभवता येते आणि क्वचितच व्यक्त होऊ शकतं."

पुढे तो लिहितो, "त्या ठिकाणची आध्यात्मिक ऊर्जा आणि इलेक्ट्रिफाइंग ऑरा असलेलं हे सर्व एकत्र एका चौकटीत आलं! गर्दीने 'हर हर महादेव' चा जयघोष केला, तेव्हा मला सर्वत्र दैवी शक्तीची अतुलनीय शक्ती जाणवली. मी. आज महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर, माझ्या 'भोला' चित्रपटातील फ्रेम्स शेअर करत आहे. हर हर महादेव!”

टॅग्स :movieviralpostAjay Devgn