Ajay Devgn: माझ्या मुलांना सांगावं लागतं माझा चित्रपट प्रदर्शित झालाय

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण हा सध्या चर्चेत आला आहे. यापूर्वी अजयला त्याच्या कोणत्याही चित्रपटाचं एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रमोशन करताना पाहिलेलं नाही.
Ajay Devgn
Ajay DevgnSakal

Bollywood News: बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) हा सध्या चर्चेत आला आहे. यापूर्वी अजयला त्याच्या कोणत्याही चित्रपटाचं एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रमोशन करताना पाहिलेलं नाही. मात्र रन वे 34 साठी त्यानं सारी ताकद पणाला लावली आहे. (Bollywood Movie) त्यामुळे अजयच्या या चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता आहे. यासगळ्यात त्यानं काही वाद अंगावरही घेतले आहेत. टॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुदीपबरोबर त्याचा वाद (Tollywood News) झाला होता. त्याचे कारण होते हिंदी राष्ट्रभाषा. अजयचं म्हणणं की, हिंदी ही त्याची मातृभाषा आणि देशाची राष्ट्रभाषा. सुदीपचं म्हणणं ती राष्ट्रभाषा कधीच होऊ शकत नाही. यावरुन दोघांमध्य़े चांगलाच वाद पेटल्याचे दिसून आले आहे. त्याची राजकीय स्तरावर देखील दखल घेण्यात आली आहे. अजयच्या कुटूंबातील सदस्यांची एक गंमतीशीर बातमी समोर आली आहे.

अजय देवगण, अमिताभ बच्चन आणि रकुलप्रीत यांच्या प्रमुख भूमिका असलेला रन वे 34 हा आज प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडला टॉलीवूडचा सामना करावा लागत आहे. त्यांचे आतापर्यत चार चित्रपट बंपर कमाई करणारे ठरले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात बॉलीवूडला तयार राहावे लागणार आहे. रन वे 34 मध्ये एका वैमानिकाची कथा मांडण्यात आली असून तो स्वताचा जीव धोक्यात घालून प्रवाशांचा जीव वाचवतो. असे त्या चित्रपटामध्ये मांडण्यात आले आहे. एका मुलाखतीमध्ये अजयनं सांगितलं की, जेव्हा आपला एखादा चित्रपट प्रदर्शित होतो तेव्हा त्याचे प्रमोशन बाहेर करणे हे तुलनेनं सोपं असतं. मात्र जेव्हा तो कुटूंबियांना पहा म्हणून सांगणे अवघड असल्याचे अजयनं सांगितलं आहे.

Ajay Devgn
Mere Desh Ki Dharti Trailer: गावच्या पोरांनी शहराकडं जायचचं कशाला?

अजयनं यावेळी त्याच्या कुटूंबियांशी संबंधित एक गोष्ट सांगितली आहे. त्यामध्ये तो म्हणतो, मला माझ्या मुलांना सांगावं लागतं की, माझा चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि तुम्ही तो पाहा. मग ते विचार करतात. आणि मला सांगतात. अशी भन्नाट प्रतिक्रिया अजयनं दिली आहे. अजयचा रन वे 34 हा चित्रपट त्याची पत्नी काजोलनं प्रोड्युस केलं आहे. काजोलला हा विषय मोठ्या कष्टानं पटवून द्यावा लागला. त्यानंतर ती तो चित्रपट तयार करण्यासाठी तयार झाली.

Ajay Devgn
Bhool Bhulaiyaa 2 Trailer: मंजुलिका परत आलीय!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com