Bholaa Teaser 2: अजय देवगणच्या 'भोला' चित्रपटाचा दुसरा टीझर रिलीज, या दिवशी होणार थिएटरमध्ये प्रदर्शित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajay Devgn

Bholaa Teaser 2: अजय देवगणच्या 'भोला' चित्रपटाचा दुसरा टीझर रिलीज, या दिवशी होणार थिएटरमध्ये प्रदर्शित

हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अजय देवगण सध्या त्याच्या आगामी 'भोला' चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'दृश्यम 2' च्या प्रचंड यशानंतर अजयचा पुढचा चित्रपट 'भोला' असणार आहे. नुकताच 'भोला'चा दुसरा टीझर रिलीज झाल्याची माहिती निर्मात्यांनी दिली. मंगळवारी 'भोला'चा दुसरा टीझर रिलीज झाला आहे. अजयच्या चित्रपटाचा हा टीझर पाहून तुमची उत्सुकता नक्कीच वाढणार आहे.

अजय देवगणच्या 'भोला' चित्रपटाचा टीझर गेल्या वर्षी 22 नोव्हेंबरला रिलीज झाला होता. त्यानंतर सर्वजण अजयच्या या अप्रतिम चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, चाहत्यांच्या प्रचंड मागणीनुसार भोला चित्रपटाचा दुसरा लेटेस्ट टीझर मंगळवारी प्रदर्शित झाला आहे. अजय देवगणने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर ही माहिती दिली आहे.

हेही वाचा: KL Rahul-Athiya: झालं एकदाचं लग्न! राहुल-अथिया हनीमूनला कधी अन् कोठे जाणार...?

याशिवाय अभिनेत्री तब्बूही एका पोलिसाच्या अवतारात कमालीची दिसत आहे. अशा परिस्थितीत एकंदरीत 'भोला'चा दुसरा टीझर खूपच चांगला आणि अप्रतिम आहे, जो या चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता द्विगुणित करेल.

'भोला'चा हा टीझर पाहिल्यानंतर आता सर्वांनाच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता लागली आहे. अजय देवगण आणि तब्बू स्टारर चित्रपट 'भोला' 30 मार्चला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेत्याशिवाय अजयने दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे. अजय देवगणचा 'भोला' हा साऊथ सिनेमाचा सुपरहिट सिनेमा 'कैथी'चा रिमेक आहे.