'मन उडू उडू झालं' फेम अजिंक्य राऊतचं इस्टा अकाऊंट हॅक |Ajinkya Raut's Instagram account hacked | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajinkya Raut's Instagram account hacked
'मन उडू उडू झालं' फेम अजिंक्य राऊतचं इस्टा अकाऊंट हॅक

'मन उडू उडू झालं' फेम अजिंक्य राऊतचं इस्टा अकाऊंट हॅक

'मन उडू उडू झालं' मालिकेतील इंद्रा म्हणजेच अजिंक्य राऊत त्याच्या हटके अंदाजामुळे चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. मात्र डॅशिंग अजिंक्यची फसवणूक झाल्याची माहिती नुकतीच समोर आली असून यामुळे त्याला त्याचं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झालं आहे.

अजिंक्यने त्याच्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत त्याचं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याची माहिती दिली आहे. "माझं @ajinkyathoughts हे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याचं सांगताना मला खुप वाईट वाटतंय. मला इंस्टाग्रामवर मॅसेज बॉक्स मध्ये 'Meta blue badge' असा मॅसेज आला. या मॅसेज मधून मला एक फॉर्म भरण्यासाठी सांगितलं गेलं. हा फॉर्म खूपच प्रामाणिक दिसत असल्याने मी तो भरण्यासाठी त्यावर गेलो, तर त्यावेळी मी माझ्या इन्स्टाग्रामवरून अचानक लॉगआऊट झालो" असं त्याने फेसबुक पोस्ट मध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा: कान्समध्ये जावून कान्सच्याच... दीपिका बिनधास्त बोलली

तसेच, आणखी एक पोस्ट शेअर करत, "हे सगळं खूप भयानक आहे. माझे १ लाख चौऱ्याहत्तर हजार फॉलोअर्स होते आणि आता ते अकाउंट हॅक झालंय. मी ते अकाउंट रिस्टोर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण मला वाटतं ते अकाउंट बंद झालं आहे" असं अजिंक्यने त्याच्या दुसऱ्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा: रानबाजारच्या बोल्ड अवतारावर प्राजक्ताची प्रतिक्रिया, मी नेहमीच....

मन उडू उडू झालं या मालिकेतील इंद्रजित साळगावकर या भूमिकेमुळे अजिंक्य तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला आहे. या मालिकेतील अभिनेत्री हृता दुर्गुळेसोबतची जोडी खुपच हिट ठरत आहे. या मालिकेतील जोडीचे अनेक रील्स इंस्टाग्रामवर व्हायरल होत असतात.

Web Title: Ajinkya Rauts Instagram Account Hacked

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top