रानबाजारच्या बोल्ड अवतारावर प्राजक्ताची प्रतिक्रिया, मी नेहमीच..... | Raan Baazaar feam Prajakta Mali a blunt answer to the trolls | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prajakta Mali
रानरानबाजारच्या बोल्ड अवतारावर प्राजक्ताची प्रतिक्रिया, मी नेहमीच....

रानबाजारच्या बोल्ड अवतारावर प्राजक्ताची प्रतिक्रिया, मी नेहमीच....

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि तेजस्वी पंडीत या दोघींचा नुकताच रानबाजार वेबसिरजचा टीझर लाँच झाला आहे. यामध्ये प्राजक्ता माळीचा बोल्ड अवतार पाहून सगळेंच थक्क झाले. वेब विश्वाला हादरुन टाकणाऱ्या वेब सीरीजच्या टीझरमधील प्राजक्ताचा सीन पाहता तिचा चाहता वर्ग तिला ट्रोल करत आहे. मात्र, तिने न डगमगता ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.

हेही वाचा: 'मलायका - अर्जुनचं शुभमंगल!' तयारी अंतिम टप्प्यात

गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीत ‘रानबाजार’ या वेबसिरीजची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच या वेबसीरिजचा टीझर प्रदर्शित झाला. या टिझर मधून अभिनेत्री प्राजक्ता माळीचा खूप बोल्ड अवतार पाहायला मिळाला. तिच्या या बोल्ड भूमिकेमुळे तिला सोशल मीडियावरील ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे

दरम्यान एका मराठी वेबला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्राजक्ताने यावर भाष्य केले आहे. "प्रत्येक कलाकाराला आपल्या कारकिर्दीत विविधांगी भूमिकांमध्ये झळकण्याची, समाजात अस्तित्वात असणारी विविध पात्रं साकारण्याची, सतत काहीतरी नवं करण्याची इच्छा असते. मी त्याला अपवाद नाही. लहानपणापासून स्मिता पाटील, रंजना यांना बघत मोठी झाले, (मी त्यांच्याइतकी मोठी नक्कीच नाही.) पण त्यांच्या कारकिर्दीतून प्रेरीत होऊन आणि तुम्हां मायबाप रसिक प्रेक्षकांवर विश्वास ठेवून केलेला हा प्रयत्न." असे तिनं प्रतिक्रियेमध्ये म्हटलं आहे.

या सीरिजमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajaktta Mali) ही सुद्धा बोल्ड लुकमध्ये दिसणार आहे. तिने ‘रानबाजार’चा दुसरा टीझर शेअर केला आहे.

हेही वाचा: रेड कार्पेटवर व्हाईट परी; उर्वशीच्या घायाळ करणाऱ्या अदा

रेगे, ठाकरे असे सिनेमे बनवणरारे आणि ज्वलंत विषय हाताळणारे दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी ही सीरिज दिग्दर्शित केली आहे. 20 मे पासून ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

'रानबाजार' (Raan Baazaar) असे नाव असलेल्या या भव्य वेब सिरीजची निर्मिती प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनीने केली आहे.

Web Title: Raan Baazaar Feam Prajakta Mali A Blunt Answer To The Trolls

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top