केरळ स्टोरीनंतर 'अजमेर ९२' वरुन उठलं वादळ! २५० हून जास्त मुलींसोबत...|Ajmer 92 After the Kerala story controversy started | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajmer 92

Ajmer 92 : केरळ स्टोरीनंतर 'अजमेर ९२' वरुन उठलं वादळ! २५० हून जास्त मुलींसोबत...

After the Kerala stroy Ajmer 92 Controversy : द केरळ स्टोरीवरुन रंगलेला वाद अजुनही काही शांत होण्याचे नाव घ्यायला तयार नाही. सुदीप्तो सेन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटानं आतापर्यत दोनशे कोटींहून अधिक कमाई केली आहे. धर्मांतर, लव जिहाद सारख्या विषयाची मांडणी करणाऱ्या केरळ स्टोरीवरुन वेगवेगळ्या प्रकारचे वाद समोर आले आहेत. After the Kerala stroy Ajmer 92 Controversy

अशातच आता केरळ स्टोरीच्या धर्तीवर आणखी काही चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. ७२ हुर या चित्रपटाचा प्रोमो व्हायरल झाला असून त्यावर द काश्मिर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्या चित्रपटाचे निर्माते अशोक पंडित यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानंतर आता अजमेर ९२ नावाच्या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे.

Also Read - Self Respect चा प्रवास दूराग्रहाकडे नको

केरळ स्टोरीला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यासारख्या वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणाऱ्या घटनांवर चित्रपटांची मालिका येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यावरुन आगामी काळात पुन्हा एकदा वेगळ्या विचार कलहाला सुरुवात होणार असल्याची चर्चा आहे. अजमेर ९२ चे पोस्टर व्हायरल होताच त्यावरुन नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया खूप काही सांगून जाणाऱ्या आहेत. केरळ स्टोरीला अनेकांनी प्रोपगंडा चित्रपट म्हणून टीका केली होती.

यावर त्या चित्रपटातील अभिनेत्री अदा शर्मानं टीकाकारांना चोख उत्तर दिले होते. टीका करण्यापूर्वी एकदा चित्रपट पाहा मग बोला असे तिनं सुनावलं होतं. आता अजमेर ९२ या चित्रपटानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा चित्रपट पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणार असून असं म्हटलं जातंय की, अल्पसंख्याक समुहावर भाष्य करणारी हा चित्रपट आहे. जमीयत उलमा ए हिंदने या चित्रपटाच्या विरोधात मोर्चा काढला आहे. आणि या चित्रपटावर बंदी घातली जावी अशी मागणी करण्यात आली आहे.

बंदीची मागणी का....

माध्यमातील सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, पुष्पेंद्र सिंह दिग्दर्शित या चित्रपटामध्ये सयाजी शिंदे, मनोज जोशी, राजेश शर्मा आणि जरीना वहाब दिसणार आहे. अजमेर ९२ ही एक सत्य घटनेवर आधारित फिल्म असून ती अल्पसंख्याक समुदायावर भाष्य करणारी आहे. अशातच जमीयतचे अध्यक्ष मौलाना महमूद मदनी यांनी त्या चित्रपटाचा विरोध केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, अजमेर शरीफ च्या दर्गाहला बदनाम करण्याचा कट यानिमित्तानं केला जात आहे.

या चित्रपटाच्या माध्यमातून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे. दोन समुहात सलोखा जोडण्याऐवजी त्यात वाद कसा होईल असे दिसते आहे.त्यामुळे आम्ही या चित्रपटाच्या विरोधात असून तो प्रदर्शित केला जाऊ नये. अशी आमची मागणी आहे. असे जमीयतच्या वतीनं सांगण्यात आले आहे.