Akanksha Dubey Death: कोण आहे समर सिंग?..आकांक्षा दुबेच्या मृत्यूनंतर ज्याच्याकडे वळल्यात संशयित नजरा..

भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेनं ब्रेकअपमुळे आत्महत्या केली असं आता म्हटलं जात आहे. त्यामुळे समर सिंग या व्यक्तीविषयी जाणून घेण्याची इच्छा सगळ्यांना आहे.
Akanksha Dubey Suicide
Akanksha Dubey SuicideInstagram

Akanksha Dubey Death: भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेनं या जगाचा निरोप घेतला आहे. सारनाथमधील सोमेंद्र हॉटेलमध्ये मॉडेल आणि अभिनेत्रीनं आत्महत्येसारखं मोठं पाऊल उचलल्यानं जो-तो हैराण झाला आहे.

तिनं आपल्या मृत्यूच्या १० ते १२ तासापूर्वी आपल्या काही पोस्ट्स शेअर केल्या होत्या. पण त्यात ती इतकी आनंदी दिसत आहे ज्यावरनं ती आत्महत्या करेल असा विश्वासच बसत नाहीय. आता सर्वजणांच्या संशयित नजरा वळल्या आहेत ते आकांक्षाच्या बॉयफ्रेंडच्या दिशेने. प्रश्न आहे की तिचा बॉयफ्रेंड नक्की आहे कोण? चला जाणून घेऊया..(Akanksha Dubey Suicide who is samar singh?Bhojpuri singer responsible for actress suicide?)

Akanksha Dubey Suicide
Dostana 2 मध्ये कार्तिकला रीप्लेस करणार 'हा' अभिनेता..तब्बूशी आहे खास कनेक्शन

'वीरों के वीर' आणि 'कसम पैदा करनेवाली की २' सारख्या सिनेमातून आकांक्षा दुबेनं काम केलं आहे. २६ मार्च,२०२३ रोजी तिनं आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे. आत्महत्येच्या दिवशी सकाळीच तिचा पवन सिंग सोबत सकाळी एक म्युझिक व्हिडीओ रिलीज झाला होता. ज्याचं नाव आहे..आरा कभी हारा नही. पण त्याच्या काही तासानंतरच आकांक्षानं आत्महत्या केल्यानं सगळेत चिंतेत आहेत. तिच्या कुटुंबावर तर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हेही वाचा: नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

Akanksha Dubey Suicide
Snehal Rai: बालपण नकोसं झालेलं या टी.व्ही अभिनेत्रीला.. कारमध्ये उपाशीपोटी झोपून काढल्यात रात्री..खुलासा करत म्हणाली..

आकांक्षा दुबे इन्स्टाग्रामवर सक्रिय असायची. ती रील्स आणि फोटो नेहमीच पोस्ट करताना दिसायची. आपल्या सर्व गाण्यांवर ती व्हिडीओ बनायची. सोबत इंग्लिश आणि बॉलीवूड गाण्यांवर लिप सिंक करुन सोशल मीडियावर धुमाकूळ घालायची. तिचा अभिनयही चांगला होता. तिच्याकडे काम नव्हतं अशातला देखील भाग नव्हता.

अवघ्या १७ व्या वर्षी तिनं मनोरंजन सृष्टीत एन्ट्री घेतली होती . २०१८ मध्ये तिनं डिप्रेशनचा सामना केला होता. त्यानंतर तिनं स्क्रीनपासून दूरी बनवली. तिनं स्वतः याविषयी खुलासा केला होता की तिला कलाकार म्हणून इंडस्ट्रीत ट्रीट केलं जात नाही. त्यामुळे तिचा आत्मविश्वास डगमगला होता.

आकांक्षा दुबे भोजपुरी गायक समर सिंगसोबत अनेक रील्स शेअर करायची. तिनं त्याच्यासोबत अनेक प्रोजेक्ट्सवर काम केलं आहे. यावर्षी १४ फेब्रुावरी,२०२३ रोजी तिनं समर सिंगसोबत दोन पोस्ट केल्या होत्या .

एका पोस्टमध्ये दोन फोटो शेअर केले होते,ज्यात ती समर सिंगकडं रोमॅंटिक अंदाजात पाहत होती आणि कॅप्शनमध्ये लिहिलं होतं,''हॅप्पी व्हॅलेंटाईन डे''. आणि दुसऱ्या पोस्टमध्ये दोघंही कोजी-कोजी पोज मध्ये दिसले.

अर्थात समर सिंगनं कधीच आकांक्षा सोबतच्या नात्यावर भाष्य केलेलं नाही. ना कधी त्यानं सोशल मीडियावर हे व्यक्त केलं. एवढंच नाही तर आकांक्षाच्या आत्महत्येनंतर त्यानं एक हॅप्पी बर्थ डे पोस्ट शेअर केली होती.

पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. चौकशीनंतर सगळं काही समोर येईल. सध्या आकांक्षाच्या आत्महत्येसाठी तिचं ब्रेकअप कारणीभूत आहे असं चिंताग्रस्त चाहते म्हणताना दिसत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com