Dostana 2 मध्ये कार्तिकला रीप्लेस करणार 'हा' अभिनेता..तब्बूशी आहे खास कनेक्शन

'दोस्ताना 2' मध्ये आधी कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत होता पण करण जोहरशी फिस्कटल्यानंतर त्यानं रातोरात सिनेमा सोडला होता ज्याची जोरदार चर्चा रंगली होती.
Kartik Aaryan
Kartik AaryanInstagram

Dostana 2: प्रियंका चोप्रा,जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चन यांच्या गाजलेल्या 'दोस्ताना' सिनेमाचा सीक्वेल येत आहे अशी चर्चा गेल्या काही दिवसांपूर्वी जोरदार रंगली होती. सिनेमात कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूर यांची नावं कन्फर्म देखील झाली होती. पण मग काय झालं कुणास ठाऊक अचानक बातमी कानावर आली की करण जोहरनं कार्तिकला सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवला.

आता पुन्हा चर्चा सुरू झाली आहे ती सिनेमात कार्तिक ऐवजी कोणाला रिप्लेस केलं आहे याची. बोललं जात आहे की जान्हवीसोबत 'दोस्ताना 2' मध्ये जो दिसेल त्याचं तब्बू सोबत कनेक्शन आहे.((Who Will replace kartik aaryan in Dostana 2?)

Kartik Aaryan
Smriti Irani:'माझा गर्भपात झाला होता अन्..', 'क्योंकी..' च्या सेटवरील हुकूमशाहीचा अनेक वर्षांनी स्मृती ईराणीकडून खुलासा

'दोस्ताना 2' विषयी बोललं जात आहे की तब्बूचा भाचा फतेह रंधावा 'दोस्ताना 2' मध्ये कार्तिकला रीप्लेस करणार आहे.

ईटाईम्सला मिळालेल्या माहितीनुसार आता जान्हवी कपूर,लक्ष्य लालवानी आणि फतेह रंधावा सिनेमात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. मात्र अद्याप अधिकृतरित्या यासंदर्भात घोषणा करण्यात आलेली नाही.

माहितीसाठी इथं नमूद करतो की फतेहचं नाव याआधी देखील 'दोस्ताना 2' संदर्भात जोडलं जात होतं पण पुन्हा यावर सगळ्यांनी मौन साधलेलं.

'दोस्ताना 2' मधून बाहेर झाल्यानंतर कार्तिकनं यावर प्रतिक्रिया दिलेली नव्हती. त्यानंतर रजत शर्मांच्या 'आप की अदालत' या टी.व्ही शो मध्ये कार्तिक यावर बोलला होता.

हेही वाचा: नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

Kartik Aaryan
Taarak Mehta ka Ooltah Chashmah मालिकेवर येतोय सिनेमा.. कोण असणार जेठालाल आणि दयाबेन..काय म्हणाले निर्माते?

रजत शर्मांनी कार्तिकला विचरालं होतं की,''करण जोहरनं तुला सिनेमातून का बाहेर काढलं?''

यावर तो म्हणाला होता,''असं कधी कधी होतं,पण मी आजपर्यंत यावर बोलणं पसंत केलं नाही. माझा माझ्या आईने दिलेल्या संस्कारांवर खूप विश्वास आहे,तिनं जे शिकवलं आहे ते मी माझ्या प्रोफेशनल लाइफमध्ये देखील वागताना उपयोगात आणतो. जेव्हा मोठ्यांसोबत तुमचं पटत नाही..वाद होतात तेव्हा मुलांनी माघार घेत शांत रहायचं..काही बोलायचं नाही''.

शो मध्ये कार्तिकला रजत यांनी आठवण करून दिली की त्यानं मानधनाची किंमत वाढवल्यानं त्याला सिनेमातनं बाहेर केलं. तेव्हा रजत यांनी करणनं केलेल्या वक्तव्याचा उल्लेख करत म्हटलं की, 'ज्याला सव्वा लाख मिळत होते त्यानं २० करोड मागितले..पैसे नाही मान्य केले तर सिनेमा सोडला?'

यावर कार्तिक म्हणाला होता,''या सगळ्या गोष्टींवर बोलणं मला स्तुत्य वाटत नाही..ही कोणत्या सूत्राकडून मिळालेली माहिती नाहीय..बस्स..लोकांनी स्वतःचं स्वतःच ठरवलं. पैशासाठी सिनेमा सोडला असं झालेलं नाही. मी लालची आहे पण स्क्रिप्टसाठी. स्क्रिप्टमध्ये काही बदल होणार होते,कोव्हिड आला होता..खूप गोष्टी घडणार होत्या..पण तसं काही झालं नाही''.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com