Akshara Singh : चला चला राजकारणात जाण्याची वेळ आली! कोणत्या पार्टीमध्ये 'अक्षरा'ची होणार एंट्री?

आपल्या गोड आवाजासाठी आणि बहारदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या अक्षराचा चाहतावर्ग मोठा आहे.
Akshara Singh Bhojpuri Actress Political Entry
Akshara Singh Bhojpuri Actress Political Entry esakal

Akshara Singh Bhojpuri Actress Political Entry : आपल्या गोड आवाजासाठी आणि बहारदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या अक्षराचा चाहतावर्ग मोठा आहे. ती सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय असणारी सेलिब्रेटी आहे. आता अक्षराच्याबाबत एका बातमीनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री अक्षरा सिंग ही आता राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. राजकारणातील मास्टर माईंड म्हणून ज्यांची ओळख आहे त्या प्रशांत किशोर हे तिला याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या भेटीनंतर अक्षरा सिंगनं मोठा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. अक्षराच्यापूर्वी भोजपूर्वी पवन सिंगनं देखील राजकारणात प्रवेश घेतला होता.

राजस्थान निवडणुकीत महिला, सिलेंडर आणि जातीय मुद्दा.! (Rajasthan Assembly Election 2023 )

अक्षरा ही आता मनोरंजन क्षेत्राबरोबर राजकारणात आपलं नशीब अजमावणार आहे. आजतकशी बोलताना अक्षरानं सांगितलं होतं की, प्रशांत किशोर यांचे मार्गदर्शन घेऊन ती त्यांच्या जन स्वराज्य पार्टीची सदस्य होणार आहे. या बातमीनंतर भोजपूरी मनोरंजन विश्वात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. भोजपूरी मनोरंजन क्षेत्रातील मनोज तिवारी अन् रवि किशन हे सेलिब्रेटी राजकारणात सध्या मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत.

अक्षरानं जन स्वराज्यमध्ये प्रवेश केल्यानंतर ती आगामी काळात लोकसभेच्या निवडणूकीत भाग घेणार असल्याचे बोलले जात आहे. अक्षरा ही पाटलीपुत्र येथील जनस्वराज्य पक्षाच्या कार्यालयात होणाऱ्या एका मुख्य कार्यक्रमात जाहीर प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अक्षराचे वडील विपिन सिंग उर्फ इंद्रजित सिंग यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, हा केवळ राजकीय प्रवेश नाही तर जन अभियान आहे ज्यातून जनविधायक कामं करायची आहेत.

Akshara Singh Bhojpuri Actress Political Entry
Kantara 2 : 'कांतारा २' येणार, प्रिक्वेलबाबत मोठी बातमी आली समोर! 'सालार' सोबत आहे खास कनेक्शन

देश आणि बिहारसाठी जे चांगले आहे ते करण्याची भूमिका आम्ही स्विकारली आहे. तोच विचार घेऊन अक्षरा तिची वाटचाल करणार आहे. माझ्या मुलीनं जेव्हा राजकीय प्रवेशाची इच्छा व्यक्त केली तेव्हा मी तिला संमती दिली. आम्ही सर्व कुटूंबीय तिच्यासोबत आहोत. असे तिच्या वडिलांनी त्या मुलाखतीतून सांगितले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com