
Bigg Boss Marathi 4: दोस्तीत कुस्ती.. अक्षय आणि अमृता देशमुख मध्ये वादाची ठिणगी!
bigg boss marathi s 4: बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्याची सुरुवातच वादापासून झाली... आणि त्यात भर म्हणजे राखीचा घरातील राडा. तिच्या चुकीच्या वागणुकीमुळे बिग बॉस यांनी काल तिला शिक्षेस पात्र आहे असे देखील सांगितले. घरातील वाद काही संपायचे नाव घेत नसताना आज अक्षय आणि अमृता देशमुखमध्ये देखील घरातील ड्युटी करण्यावरून रात्री वाद होताना दिसणार आहे.
हेही वाचा: Parag Bedekar Passes Away: अभिनेता दिग्दर्शक पराग बेडेकर यांचे निधन..
अक्षय म्हणाला,' मी सकाळची आणि दुपारची भांडी सुद्धा घासली आणि रात्रीची सुद्धा... त्यावर अमृता म्हणाली, हळू बोल.. अक्षय म्हणाला, 'तू मला झोपेतून उठवायला आलीस म्हणून...' त्यावर अमृता म्हणाली, 'मी विसरले होते, मी आता हो म्हणाले. तू हळू बोल ना? रात्र झाली आहे.' मग अक्षय म्हणाला, 'हळू बोल हे तू मला नको सांगुस... हा माझा नॉर्मल टोन आहे.. कोणीही झोपलेलं नाहीये.'
हेही वाचा: Usha Mangeshkar Birthday: 'या' गाण्यामुळे उषा मंगेशकर रातोरात स्टार बनल्या..
नंतर या दोघांच्या भांडणात आरोह येतो. आरोख म्हणाला.. अक्षय तू का चिडतो आहेस? त्यावर अक्षय म्हणाला, 'एक मिनिटं.. मी झोपलो होतो आणि हिने झोपेतून उठवून म्हंटलं. झोपेतून उठवून जी माणसं आपली तत्व मांडतात ना तर त्यांनी पहिले त्या तत्वांबद्दल विचार करावा. मी आधीच बोलो होतो.. मी उद्या घासतो.. मग उठवायच्या आधी हा विचार करायचा...' पण कुणीही माघार घ्यायला तयार नसल्याने हा वाद असाच सुरु राहिला. आता काय होईल ते आजच्या भगत कळेलच.