ट्रान्सजेंडरला पाठिंबा देत अक्षय कुमारने शेअर केला व्हिडिओ, म्हणाला 'अब हमारी बारी है'

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Saturday, 7 November 2020

अक्षयने एक व्हिडिओ रिलीज केला आहे ज्यामध्ये तो ट्रान्सजेंडर्सना पाठिंबा देताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये अक्षय कुमारसोबत कियारा अडवाणी आणि लक्ष्मी नारायण त्रिपाठी देखील दिसून येत आहेत. 

मुंबई- अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी स्टारर लक्ष्मी हा सिनेमा ९ नोव्हेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. या हॉरर कॉमेडी सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमात अक्षय कुमार ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसून येणार आहे. अक्षयला या अवतारात पाहण्यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत. यादरम्यान अक्षयने एक व्हिडिओ रिलीज केला आहे ज्यामध्ये तो ट्रान्सजेंडर्सना पाठिंबा देताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये अक्षय कुमारसोबत कियारा अडवाणी आणि लक्ष्मी नारायण त्रिपाठी देखील दिसून येत आहेत. 

हे ही वाचा: ए.आर. रहमानच्या लेकीचं ‘हे’ गाणं ऐकलंत का? वडिलांसोबत काम करण्याविषयी काय सांगतेय खातिजा?  

अक्षय कुमारने या व्हिडिओच्या माध्यमातून देशातील जनतेला ट्रांसजेंडर यांच्या प्रती त्यांचा असलेला दृष्टीकोन बदलण्यासाठी आवाहन केलं आहे. हा व्हिडिओ शेअर करताना अक्षयने कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'आता आपली वेळ आहे. नजर लागण्यापासून बचाव करण्यासाठी अनेक टिक्के लावले मात्र दृष्टीकोन बदलणारा टिक्का लावण्याची आता आमची वेळ आहे. चला लिंगभिदाची परंपरा मोडूया आणि लाल टिक्क्यासोबत तिस-या लिंगाला समर्थन द्या जे समान प्रेम आणि सन्मानासाठी उभे आहेत.'

या व्हिडिओमध्ये अक्षय कुमारने म्हटलंय, 'सगळ्या सेलिब्रेशनमध्ये यांनी आत्तापर्यंत आनंदाने आशिर्वाद दिले आहेत. त्यांची मेहफिल सजवण्याची आता आपली वेळ आहे. सीमेवर लढण्यासाठी हे नेहमी तयार आहेत केवळ प्रोत्साहन देण्याची आपली वेळ आहे. देवानेच दिलेली देणगी आहे केवळ यांना स्विकारायची आपली वेळ आहे.'  

akshay kumar and kiara advani shares an emotional video in support of transgender community  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akshay kumar and kiara advani shares an emotional video in support of transgender community