
संगीतकार ए. आर. रहमान यांची मुलगी खातिजा रहमान देखील तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली होती. मात्र यावेळी खातिजा चर्चेत येण्याचं कारण खास आहे. खातिजा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत संगीत क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज असल्याचं दिसून आलंय.
मुंबई- बॉलिवूडमध्ये सध्या स्टारकिड्स या ना त्या कारणाने चर्चेत आहेत. यामध्ये तैमूर, आलिया भट्ट असे अनेक स्टारकिड्स नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी अशीच प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांची मुलगी खातिजा रहमान देखील तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली होती. मात्र यावेळी खातिजा चर्चेत येण्याचं कारण खास आहे. खातिजा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत संगीत क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज असल्याचं दिसून आलंय.
नुकतंच ए आर रहमान यांची मुलगी खातिजाने ‘फरिश्तो’ या गाण्याच्या माध्यमातून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केलं. विशेष म्हणजे खातिजाने या गाण्यातून एक महत्वाचा संदेश दिला आहे. “हे एक ऍनिमेटेड गाणं आहे.ज्यामध्ये या लहान मुलीला जग शांत हवंय. मला माझ्या गाण्यातून एक खास संदेश सगळ्यांना द्यायचा होता. मात्र या गाण्यातून श्रोत्यांचं मनोरंजन होईल हे नक्की. संगीत हे असं माध्यम आहे ज्यातून आपण सगळ्यांपर्यंत एक खास संदेश पोहोचवू शकतो. या गाण्याच्या माध्यमातून एका ताकदीच्या स्त्रीची, महिलेची कथा मांडण्यात आली आहे”, असं खातिजा म्हणाली. तसंच वडिलांसोबत काम करण्याचा अनुभवही उत्तम असल्याचं तिने शेअर केलंय केलंय.
खातिजा बॉलीवूडच्या लाइम लाइटपासून दूर असली तरीदेखील अनेकदा चाहत्यांमध्ये तिच्या चर्चा रंगत असतात. विशेष म्हणजे खातिजा ‘फरिश्तो’नंतर आणखी एक संदेश देणारं गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, तिचं हे नवीन गाणं कधी येणार हे अद्याप निश्चित नाहीये.
khatija rahman daughter of ar rahman speak on animated song farishton