‘बेल बॉटम’ येणार लवकरच रसिकांच्या भेटीला ; अक्षयने कुमारने सांगितली प्रदर्शनाची तारीख

युगंधर ताजणे
Thursday, 1 October 2020

अक्षयने आपल्या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेयर करुन चाहत्यांना खुशखबर दिली आहे. त्याचा ‘बेल बॉटम’हा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार असल्याचे अक्षयने सांगितले. तसेच सोशल मीडियातुन रिलीज डेटही सांगुन त्या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवली आहे. गेल्या काही काळापासून सतत चर्चेत राहिलेल्या ‘बेल बॉटम’ या चित्रपटाचं चित्रीकरण अखेर पूर्ण झालं आहे.

मुंबई - कोरोनाचा फटका बॉलीवूडला मोठ्या प्रमाणावर बसला. यामुळे अनेक निर्मात्यांची डोकेदुखी वाढली. दरवर्षी भारतात पाचशेहुन अधिक चित्रपट प्रदर्शित होतात. कोरोनाचा वाढता प्रभाव यामुळे चार महिने देशभरात लॉकडाऊन करण्यात आले होते. अद्याप काही ठिकाणी स्वयंस्फुर्तीने बंद सुरु आहे. नुकतेच शासनाने अनलॉक ५ मध्ये निर्माते आणि दिग्दर्शक यांना दिलासा दिला आहे.

अक्षयने आपल्या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेयर करुन चाहत्यांना खुशखबर दिली आहे. त्याचा ‘बेल बॉटम’हा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार असल्याचे अक्षयने सांगितले. तसेच सोशल मीडियातुन रिलीज डेटही सांगुन त्या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवली आहे. गेल्या काही काळापासून सतत चर्चेत राहिलेल्या ‘बेल बॉटम’ या चित्रपटाचं चित्रीकरण अखेर पूर्ण झालं आहे. तसंच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखदेखील जाहीर करण्यात आली आहे. लॉकडाउननंतर विदेशात चित्रीकरण होणारा ‘बेल बॉटम’ हा पहिला चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाचं स्कॉटलॅण्डमध्ये चित्रीकरण पार पडलं आहे. हा चित्रपट २ एप्रिल २०२१ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन रंजित तिवारी यांनी केलं आहे.

चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. याशिवाय त्यांनी चित्रपटाचं नवीन पोस्टरदेखील शेअर केलं आहे. अभिनेता अक्षय कुमार यानेदेखील ट्विट करुन चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. एकट्याने केलं असतं तर फार थोडंथोडकं झालं असतं. मात्र, सगळ्यांनी मिळून केल्यामुळे मोठं काम पार पडलं आहे. हे टीमवर्क आहे. असे म्हणून त्याने टीममधील प्रत्येकाचे मनापासून आभार मानले आहेत. बेल बॉटमचं चित्रीकरण पूर्ण झाल आहे. हे पाहा नवीन पोस्टर. हा चित्रपट २ एप्रिल २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल”, अशी पोस्ट अक्षयने शेअर केली आहे.

 

Alone we can do so little, together we can do so much. Its teamwork and I am grateful to each and every member of the cast and crew. #BellBottomCompleted. Here’s the poster
.@Vaaniofficial @humasqureshi @LaraDutta @vashubhagnani @ranjit_tiwari @jackkybhagnani @honeybhagnani pic.twitter.com/Wyf08FMcen

— Akshay Kumar (@akshaykumar) October 1, 2020

class="rtejustify"> 

 

येत्या काळात ‘सूर्यवंशी’ ‘लक्ष्मी बम’, ‘पृथ्वी राज’ ‘बच्चन पांडे’, ‘अतरंगी रे’ ‘धूम 4’ आणि ‘बेल बॉटम’ असे अक्षयचे एकूण सात चित्रपट प्रदर्शित होणार आहे. बेल बॉटम  चित्रपटात अक्षयसोबत अभिनेत्री हुमा कुरेशी, वानी कपूर, लारा दत्ता या अभिनेत्री स्क्रीन शेअर करणार आहेत. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार या वर्षात एकापेक्षा एक हिट चित्रपट देण्यास तयार आले.   

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akshay Kumar Announces As Soon As Cinema Hall Opens Bell Bottom To Be Released