अक्षय कुमार म्हणतो, 'रोड किसीके बाप का नहीं है...'

गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

'सडक सुरक्षा जीवन रक्षा', 'रोड किसीके बाप का नहीं है' या पंच लाईनमुळे या जाहिराती चांगल्याच व्हायरल होत आहेत.

अभिनयासोबतच सामाजिक जबाबदारीचे भान असलेल्या अक्षय कुमारने भारत सरकारसाठी 'स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षेसाठी वाहतुकीचे नियम पाळा' अशा आशयाच्या जाहिराती करून पुन्हा एकदा समाजात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. 'रस्ता सुरक्षा व जागरूकता अभियानाच्या' अंतर्गत शासनाच्या महामार्ग व वाहतूक मंत्रालयाने या जाहिराती प्रदर्शित केल्या आहेत. 

गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे, नो एंन्ट्रीतून गाडी चालवणे, दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करणे असे वाहतुकीचे वारंवार उल्लंघन होणारे विषय यात मांडण्यात आले आहेत. 'सडक सुरक्षा जीवन रक्षा', 'रोड किसीके बाप का नहीं है' या पंच लाईनमुळे या जाहिराती चांगल्याच व्हायरल होत आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akshay kumar aware on road safety through advertisement