Akshay Kumar ठरला भारतातील सगळ्यात सुंदर पुरुष.. Hritik Roshan ला टाकलं मागे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

akshay kumar, akshay kumar movies, akshay kumar news

Akshay Kumar ठरला भारतातील सगळ्यात सुंदर पुरुष.. Hritik Roshan ला टाकलं मागे

Akshay Kumar News: बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार सध्या चर्चेत आहे. अक्षयचे सिनेमे सध्या फ्लॉप होत असले तरीही अक्षय कुमारचा सगळीकडे बोलबाला आहे. अक्षय कुमार सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलाय.

याचं कारण म्हणजे... भारतातील दिसायला सुंदर असलेला नंबर १ सेलिब्रिटी कोण याचा सर्व्हे निघाला. या सर्व्हेमध्ये अक्षय कुमारने नंबर १ स्थान पटकावलं आहे.

(Akshay Kumar became the most handsome man in India..)

#India Today च्या सर्वेक्षणानुसार Akshay Kumar हा भारतातील सर्वात सुंदर दिसणारा व्यक्ती ठरला आहे.

याशिवाय या सर्व्हे मध्ये नंबर २ वर सलमान खान, नंबर ३ वर हृतिक रोशन, शाहरुख खान नंबर ४ वर आमिर खान ५ नंबरवर आहे. अशाप्रकारे अक्षय कुमार हा भारतातील सगळ्यात सुंदर व्यक्ती ठरला आहे.

काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमारचा 'सेल्फी' सिनेमा रिलीज झाला. 'सेल्फी' सिनेमाची तर बॉक्स ऑफिसवर खूपच वाईट अवस्था झालेली पहायला मिळाली. हा सिनेमा अक्षय कुमारच्या सबंध करिअर मधला सगळ्यात मोठा फ्लॉप सिनेमा म्हणून जाहीर करण्यात आला.

अनेकांना वाटत होतं कि, इम्रान हाश्मी आणि अक्षय कुमार यांचा सेल्फी सुपरहिट होईल. पण सिनेमा मात्र सपशेल आपटला.

सध्या अक्षय कुमार एंटरटेन्मेंट टूरच्या माध्यमातून परदेशात स्टेजवर धडाकेबाज डान्स करताना दिसला..पण त्याच्या डान्समुळे तो ट्रोलही झालेला पहायला मिळत आहे. यादरम्यान सोशल मीडियावर या टूरमधले अनेक व्हिडीओज व्हायरल होताना दिसत आहेत.

व्हीडिओमध्ये अक्षय कुमार अमेरिकेत परफॉर्म करताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत अक्षय कुमार घागरा घालून परफॉर्म करताना नजरेस पडत आहे. पण याच परफॉर्मन्सने अक्षय कुमारला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलंय.

अक्षय कुमारचा नुकताच रिलीज झालेला सेल्फी फ्लॉप ठरला पण अक्षयचे आगामी सिनेमे नक्कीच सुपरहिट होऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अक्षय आता ओह माय गॉड २, वेडात मराठे वीर दौडले सात, बडे मिया छोटे मिया अशा सिनेमांमध्ये झळकणार आहे.