नरेंद्र मोदींना 'तो' प्रश्न विचारून ट्रोल झाला होता अक्षय..आता म्हणतोय,'मला PMO ऑफिसमधूनच..' Akshay Kumar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akshay Kumar & PM Narendra Modi

Akshay Kumar: नरेंद्र मोदींना 'तो' प्रश्न विचारून ट्रोल झाला होता अक्षय..आता म्हणतोय,'मला PMO ऑफिसमधूनच..'

Akshay Kumar: बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या जोरदार चर्चेत आहे. एकीकडे अभिनेत्याचा 'सेल्फी' सिनेमा प्रेक्षकांचं थिएटरमध्ये मनोरंजन करतोय. तर,दुसरीकडे अभिनेता मुलाखती दरम्यान सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरंही देताना दिसत आहे.

२०१९ मध्ये अक्षय कुमारनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखती दरम्यान अभिनेत्यानं देशाच्या पंतप्रधानांना विचारलं होतं की,'तुम्हाला आंबे आवडतात का?', जेव्हा या मुलाखतीचा व्हिडीओ समोर आला तेव्हा अभिनेत्याला यावरनं खूप ट्रोल केलं गेलं.

त्यावर अक्षयनं आता जाऊन आपण पंतप्रधानांना हा प्रश्न का विचारला होता यासंदर्भात स्पष्टिकरण दिलं आहे. चला जाणून घेऊया नेमका अभिनेता काय म्हणालाय.(Akshay Kumar reacts to massive trolls over asking pm narendra modi silly question)

अभिनेत्यानं एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखती दरम्यान म्हटलं आहे की, ''जेव्हा मी मुलाखत घ्यायला तिथे गेलो,तेव्हा मी एक सर्वसाधारण माणूस होतो. तेव्हा माझ्या डोक्यात जे काही प्रश्न आले ते मी विचारले.

''तुम्हाला कोणत्या प्रकारचे आंबे आवडतात?',' तुम्हाला जे पैसे मिळतात ते तुम्ही आईला देता का?', 'तुम्ही घड्याळात एका विशिष्ट पद्धतीनं का पाहता?. हे सगळे प्रश्न नॉर्मल होते. हे असे प्रश्न होते जे कुणी सर्व सामान्य माणूस एखाद्या मोठ्या व्यक्तिला विचारू शकतो''.

''मी विचारच नाही केला की एखादा प्रश्न विचारणं योग्य राहिल की अयोग्य. आणि कोणी मला काही बोललं नाही..खरं सांगतो. ना पंतप्रधानांनी..ना पंतप्रधान कार्यालयातून कुणी मला काही बोललं की हे विचारा..ते विचारू नका. ते एवढंच म्हणाले की,जे प्रश्न तुमच्या मनात येतील ते तुम्ही विचारू शकता. आणि मी तेच केले''.

हेही वाचा: डिजिटल लोन्स विषयी सर्वकाही

अक्षय पुढे म्हणाला,''मी तेच प्रश्न विचारले ज्याची उत्तरं एका सर्वसामान्य माणसाला ऐकायला आवडतील. मी जास्त विचार नाही केला. उन्हाळ्याचे दिवस होते. आंब्यांचा सिझन होता म्हणून मी त्यांना तुम्हाला कोणत्या प्रकारचे आंबे खायला आवडतात हा प्रश्न विचारला. मला जे आवडलं विचारायला ते मी विचारलं. तिथल्या लोकांनी देखील मला असेच प्रश्न विचारले''.

एकानं मला विचारलं,''तू गुलाबी पॅंट का घातलीयस?'' उत्तरादाखल मी म्हटलं की,''का?पंतप्रधानांना हा रंग पसंत नाही का?''

''आपले पंतप्रधान खूप चांगले आहेत,प्रेमळ आहेत,आणि त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. मला तेव्हा एक गोष्ट कळली ती म्हणजे त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर खूप चांगला आहे''.