Selfiee OTT Release: शहजादा आणि पठाणनंतर आता अक्षय कुमारचा सेल्फी OTT वर, जाणून घ्या केव्हा आणि कुठे पहायचा

अक्षय कुमार आणि इमरान हाश्मीचा अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपट सेल्फी OTT वर प्रसारित झाला आहे.
akshay kumar
akshay kumar Sakal

अक्षय कुमार आणि इमरान हाश्मीचा अॅक्शन ड्रामा चित्रपट सेल्फी OTT वर प्रसारित झाला आहे. हा चित्रपट यावर्षी फेब्रुवारीमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.

2023 मध्ये रिलीज झालेला हा अक्षयचा वर्षातील पहिला चित्रपट आहे. मात्र, सेल्फी बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. त्याच वेळी, काही महिन्यांनंतर ते ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. सेल्फीपूर्वी या वर्षी अनेक चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाले आहेत. डिस्ने प्लस हॉटस्टारवर २१ एप्रिल रोजी सेल्फी रिलीज झाला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मने चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे

akshay kumar
Sheezan Khan: तुच माझा 'चांद'! रमजान ईद निमित्त शिझानला आठवली तुनिषा...पोस्ट व्हायरल

सेल्फी या चित्रपटात अक्षय कुमारने अभिनेता विजय कुमारची भूमिका साकारली होती. त्याचवेळी इमरान हाश्मी आरटीओ इन्स्पेक्टर ओम प्रकाश अग्रवालच्या भूमिकेत दिसला.

डायना पेंटी आणि नुसरत भरुचा यांनी इमरान हाश्मी आणि अक्षय कुमार यांच्या सेल्फी या चित्रपटात काम केले आहे. रिपोर्टनुसार, चित्रपट बॉक्स ऑफिसवर केवळ 17.03 कोटी रुपये कलेक्शन करू शकला.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, इमरान हाश्मी सध्या त्याचा नवीन चित्रपट टायगर 3 ची तयारी करत आहे. यामध्ये तो सलमान खानसोबत दिसणार आहे. त्याचवेळी अक्षय कुमारचे 'बडे मियाँ छोटे मियाँ', 'OMG 2', 'कॅप्सूल गिल' आणि 'हेरा फेरी 3' यासह अनेक चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com