परदेशात अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी'चा बोलबाला, कमाईचा केला रेकॉर्ड

दिपाली राणे-म्हात्रे
Tuesday, 17 November 2020

भारतासोबतंच हा सिनेमा ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड, फीजी, पापुआ न्यु गिनी आणि दुबईच्या थिएटर्समध्ये रिलीज केला गेला. भारतात या सिनेमाला जरी प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मिळाला नसला तरी परदेशात मात्र या सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर चांगलाच बोलबाला होता.   

मुंबई- बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारचा नुकताच 'लक्ष्मी' हा सिनेमा रिलीज झाला. भारतात ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा ९ नोव्हेंबर रोजी रिलीज केला गेला. या सिनेमाला सिनेसमीक्षकांची पसंती मिळाली नाही सोबतंच प्रेक्षकांना देखील हा सिनेमा तितका आवडला नाही. भारतासोबतंच हा सिनेमा ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड, फीजी, पापुआ न्यु गिनी आणि दुबईच्या थिएटर्समध्ये रिलीज केला गेला. भारतात या सिनेमाला जरी प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मिळाला नसला तरी परदेशात मात्र या सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर चांगलाच बोलबाला होता.   

हे ही वाचा: दीपिका पदूकोणने शेअर केलं मीम, स्वतःला म्हणाली काजू कतली तर रणवीरला म्हटलं मोतिचूर का लड्डू  

सिनेसमीक्षक तरण आदर्शने सोशल मिडियावर सांगितलंय की, दुबईमध्ये 'लक्ष्मी' रिलीज झाल्यानंतर १ कोटी ४६ लाखांची कमाई केली आहे तर फिजीमध्ये १७ कोटी १६ लाख, ऑस्ट्रेलियामध्ये ७० कोटी ४८ लाख, पापुआ न्यु गिनीमध्ये १८ हजार आणि न्युझिलँडमध्ये ४२ लाख ३८ हजारची कमाई केली आहे. 

 

 

अक्षय कुमारने या सिनेमात एक असं पात्र साकारलं आहे ज्याच्यामध्ये किन्नरची आत्मा प्रवेश करते. अक्षय व्यतिरिक्त या सिनेमात कियारा अडवाणी, अश्विनी काळसेकर, राजेश शर्मा, आयशा रजा, आणि मनु ऋषी मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन  राघव लॉरेन्स यांनी केलं आहे. हा 'कंचना' या तमिळ सिनेमाचा रिमेक आहे.    

akshay kumar film laxmii is an overseas blockbuster  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akshay kumar film laxmii is an overseas blockbuster