esakal | 'बच्चन पांडे' सिनेमातील अक्षय कुमारचा गँगस्टर लूक होतोय ट्रेंड
sakal

बोलून बातमी शोधा

akshay

'बच्चन पांडे' सिनेमाच्या निर्मात्यांनी या सिनेमाचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज केला आहे. सिनेमाच्या सेटवरील अक्षयचा एक फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. 

'बच्चन पांडे' सिनेमातील अक्षय कुमारचा गँगस्टर लूक होतोय ट्रेंड

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी 'बच्चन पांडे' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळतेय. सिनेमात गँगस्टरची भूमिका साकारणा-या अक्षय कुमारचा फर्स्ट लूक पाहण्यासाठी चाहते आतुरलेले आहेत. मात्र त्यांची ही प्रतिक्षा आता संपली आहे. कारण 'बच्चन पांडे' सिनेमाच्या निर्मात्यांनी या सिनेमाचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज केला आहे. सिनेमाच्या सेटवरील अक्षयचा एक फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. 

हे ही वाचा: कपिल शर्माला मुंबई क्राईम ब्रांचने बजावले समन्स 

सेटवरुन व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये अक्षयचा वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. तो खूप रागात बसलेला दिसतोय आणि त्याच्या डोक्यावर लाल कपडा बांधलेला आहे. हा व्हायरल फोटो पाहून असं दिसतंय की तो त्याच्या सीनची तयारी करत आहे. सोशल मिडियावर हा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून चाहते अंदाज लावत आहेत की अक्षय कुमार पुन्हा एकदा धुमाकुळ घालण्यासाठी सज्ज झालेला दिसतोय. फरहाद सामजीचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाच्या माध्यमातून खिलाडी कुमार पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपलंसं करण्यासाठी तयार आहे.

'बच्चन पांडे' सिनेमात अक्षय कुमारसोबत क्रिती सॅनन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर अक्षय आणि क्रिती सॅननची जोडी एकत्र पाहायला मिळणार आहे. याआधी  अक्षयने क्रितीच्या बहीणीसोबत एक म्युझिक व्हिडिओ केला होता. 'बच्चन पांडे' सिनेमाच्या सेटवरुन आणखी काही फोटो व्हायरल झाले आहेत जे स्वतः क्रिती सॅनने शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत क्रितीने सांगितलंय की याच प्रोडक्शनसोबत तिने तिचा पहिला सिनेमा केला होता. 

अक्षयच्या बाबतीच सांगायचं झालं तर तो 'बच्चन पांडे' सिनेमा व्यतिरिक्त 'बेल बॉटम', 'राम सेतु' या सिनेमात देखील दिसणार आहे. एकीकडे 'बेलबॉटम' सिनेमाची शूटींग संपली आहे तर दुसरीकडे 'राम सेतु' सिनेमाच्या शूटींगला सुरुवात होणं बाकी आहे. अक्षयला शेवटचं 'लक्ष्मी' या सिनेमात पाहिलं गेलं होतं या सिनेमाला प्रेक्षकांचा आणि समीक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता.    

akshay kumar first look from bachchan pandey going viral on social media  

loading image