esakal | 'बेल बॉटम'च्या मानधनाच्या चर्चांवर अक्षय कुमारचा खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

akshay kumar

'बेल बॉटम'च्या मानधनाच्या चर्चांवर अक्षय कुमारचा खुलासा

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार (akshay kumar) त्याच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. अक्षयच्या 'बेलबॉटम' या आगामी चित्रपटाची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. काही दिवसांपूर्वी अक्षयने 'बेल बॉटम' (bell bottom) या चित्रपटाची घोषणा केली होती. त्याचबरोबर या चित्रपटाचे पहिले पोस्टर देखील शेअर केले होते. या चित्रपटामध्ये तो 80च्या दशकातल्या रेट्रो लूकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर शेअर करून अक्षयने कॅप्शन दिले होते, '80च्या दशकात जाण्यासाठी अन् रोलर कोस्टर राईडसाठी तयार राहा.' हा चित्रपट एप्रिल महिन्यामध्ये प्रदर्शित होणार पण चित्रपटगृह बंद असल्यामुळे प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात आली. सध्या याच चित्रपटाच्या मानधनावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. अक्षयने मानधनातून ३० कोटी रुपये कमी केल्याची ही चर्चा आहे. त्यावर आता खुद्द अक्षयनेच खुलासा केला आहे. (akshay kumar gave reply to report that says he reducing the fee for bell bottom movie)

‘बेल बॉटम’ या चित्रपटासाठी अक्षय कुमारने 117 कोटी रुपये अ‍ॅडव्हान्स घेतले होते असं वृत्त एका वेब पोर्टलने दिलं होतं. 'बेल बॉटम या चित्रपटासाठी अक्षयला निर्माते वाशु भगनानी यांनी 30 कोटी मानधन कमी करण्याची विनंती केली आणि अक्षयने ही विनंती मान्यदेखील केली आहे', असं वृत्त देण्यात आलं होतं. या चर्चांवर उत्तर देत अक्षयने ट्विट केले, 'कसल्या खोट्या बातम्यांनी दिवसाची सुरूवात होतेय.' तर निर्माते वाशु भगनानी यांनीसुद्धा ट्विट करत हे वृत्त साफ खोटं असल्याचं स्पष्ट केलं.

हेही वाचा: 'मराठी मुलगा भेटला नाही का?' सोनालीनं दिलं भन्नाट उत्तर

अक्षयच्या ‘बेल बॉटम’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. सप्टेंबर 1981 ते ऑगस्ट 1984 मध्ये झालेल्या विमान हायजॅकिंगवर या चित्रपटाचे कथानक लिहिले गेले आहे. या चित्रपटामध्ये लारा दत्ता, वाणी, हुमा कुरेशी आणि अक्षय प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ‘सूर्यवंशी आणि बेल बॉटम या चित्रपटांबाबत चाहत्यांचा उत्साह पाहून मी आनंदीत आहे. त्यांच्या या प्रेमासाठी मी त्यांचा ऋणी आहे. मात्र, हे दोन्ही चित्रपट स्वातंत्र्यदिनी रिलीज होणार असल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत. दोन्ही चित्रपटांचे निर्माते रिलीज डेटवर विचार करत आहे. योग्य वेळ आल्यावर दोन्ही चित्रपटांची रिलीज डेट जाहीर केली जाईल’, असं अक्षयने स्पष्ट केलं होतं.

loading image