Akshay Kumar आता लवकरच होणार भारताचा नागरिक..कॅनडाचं नागरिकत्त्व सोडताना म्हणाला.. Akshay Kumar Giving Up canadian citizenship | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akshay Kumar

Akshay Kumar आता लवकरच होणार भारताचा नागरिक..कॅनडाचं नागरिकत्त्व सोडताना म्हणाला..

Akshay Kumar: बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारनं कॅनडाचं नागरिकत्व सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचं झालं असं की प्रत्येक सिनेमाच्या रिलीज वेळी अभिनेत्याला कॅनडाच्या नागरिकत्वावरनं ट्रोल केलं जातं.

त्याला सोशल मीडियावर खूप उलट-सुलट बोललं जातं. हेच कारण आहे की आता अभिनेत्यानं आपला सिनेमा 'सेल्फी' च्या रिलीजआधी एक दिवस या गोष्टीची माहिती दिली आहे की त्यानं भारतीय पासपोर्टसाठी अॅप्लिकेशन केलं आहे आणि कॅनडाचं नागरिकत्त्व तो सोडत आहे.(Akshay Kumar is giving up canadian citizenship now he will receive indian passport)

अक्षय कुमारनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी माहिती दिली आहे. अभिनेत्यानं मुलाखतीत सांगितलं आहे की,''मला वाईट वाटतं जेव्हा लोकं माझ्या नागरिकत्वावरनं प्रश्न निर्माण करतात. कॅनडाचं नागरिकत्व स्विकारण्याचं कारण समजल्याशिवाय लोक माझ्या बाबतीत वाईट गोष्टी बोलतात''.

''भारत माझ्यासाठी सगळं काही आहे..मी जे पण कमावलं आहे...जे काही मिळवलं आहे..सगळं माझ्या या भारतीय मातीत. मी खूप भाग्यशाली आहे की मला भारतासाठी काहीतरी करण्याची संधी मिळत आहे. वाईट वाटतं जेव्हा लोक काही समजून घेतल्याशिवाय भाष्य करतात''.

अक्षय कुमार पुढे म्हणाला, ''एक वेळ होती जेव्हा मी १५ पेक्षा अधिक फ्लॉप सिनेमे दिले होते. १९९० चं दशक होतं ते. बॉक्सऑफिसवरील माझ्या सिनेमाच्या खराब प्रदर्शनानं मला त्यावेळी कॅनडाचं नागरिकत्व घेण्यासाठी प्रेरित केलं''.

'' मी त्यावेळी खूप टेन्शनमध्ये होतो. माझे सिनेमे चालत नव्हते. मी काम करत होतो पण यश मिळत नव्हतं. तेव्हा मी माझ्या मित्राकडे सल्ला मागायला गेलो. माझा मित्र कॅनडाला राहत होता''.

तो म्हणाला, ''इथे ये. आणि मी कॅनडाच्या नागरिकत्त्वासाठी अप्लाय केला. आणि मला कॅनडाचं नागरिकत्व मिळालेही''.

अक्षय कुमार पुढे म्हणाला,''माझं नशीब चांगलं होतं. १५ फ्लॉप सिनेमांनंतर दोनं सिनेमे बॅक टू बॅक सुपरहिट राहिले. माझ्या मित्रानं सांगितलं,परत जा,पुन्हा काम सुरू कर. मला काही सिनेमे मिळाले आणि त्यांनी देखील चांगली कमाई केली''.

''त्या सगळ्या कामाच्या धावपळीत मी विसरून गेलो की माझ्याजवळ कोणता पासपोर्ट आहे. मी कधीच याविषयी विचार केला नाही. पण हो.आता मी माझा पासपोर्ट बदलण्यासाठी दिला आहे''.

माहितीसाठी सांगतो की २४ फेब्रुवारी रोजी अक्षय कुमारचा 'सेल्फी' सिनेमा सिनेमागृहात रिलीज होत आहे. या सिनेमात अक्षय सोबत इम्रान हाश्मि देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे.