पृथ्वीराज नव्हे 'सम्राट पृथ्वीराज'; अक्षय कुमारच्या चित्रपटाचं नाव बदललं

करणी सेनेनं कोर्टात धाव घेतल्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाचं नाव बदललं आहे.
 
Akshay Kumar Prithviraj movie trailer viral
Akshay Kumar Prithviraj movie trailer viral esakal

मुंबई : बॉलिवडूचा खिलाडी अक्षय कुमारचा बहुचर्चित चित्रपट 'पृथ्वीराज'चं नाव बदलण्यात आलं आहे. नाव बदलल्यानंतर आता नवं नाव 'सम्राट पृथ्वीराज' असं असणार आहे. करणी सेनेनं कोर्टात धाव घेतल्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाचं नाव बदललं आहे. येत्या ३ जून रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. इंडिया टुडेनं अधिकृत सुत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. (Akshay Kumar Movie Prithviraj title changed it is now Samrat Prithviraj)

श्री राजपूत करणी सेनेनं या चित्रपटाच्या नावाविरोधात कोर्टात धाव घेत जनहित याचिका दाखल केली होती. तसेच याबाबत अनेक बैठका आणि नोटीशा मिळाल्यानंतर पृथ्वीराज चित्रपटाचे निर्माते यशराज फिल्म्सनं राजपूत समाजाच्या भावाना आणि मागणीचा विचार करता चित्रपटाचं नाव त्यांनी पृ्थ्वीराज वरुन सम्राट पृथ्वीराज असा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

यशराज फिल्म्सनं निवेदनात काय म्हटलं?

करणी सेनेनं चित्रपटाचं नाव बदलण्याचा निर्णय घेतल्यानंतर करणी सेनेला एक पत्र लिहून याची माहिती दिली. या पत्रात यशराज फिल्म्सचे सीईओ अक्षये विधानी यांनी म्हटलं की, गेल्या ५० वर्षांपासून यशराज फिल्म्स भारतीय सिनेमा क्षेत्रात काम करत आहे. भारतीय सिनेमाच्या इतिहासात यशराज फिल्म्सनं अनेक आयकॉनिक सिनेमे दिले आहेत. सातत्यानं आम्ही रसिकांचं मनोरंजन करत आहोत आणि करत राहू.

आमच्या सिनेमाच्या सध्याच्या नावासंबंधी तुमची जी तक्रार होती त्याची आम्ही दखल घेतली आहे. यावर आम्ही तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की, आम्ही कोणाच्याही भावना दुखावतील किंवा शूर योद्धा पृथ्वीराज चौहान यांचा अपमान होणार नाही याची काळजी घेऊ. उलट आम्ही त्यांच्या शौर्याचं, कामगिरीचं आणि देशाच्या इतिहासात दिलेलं योगदान याचा आदर करतो.

यासंदर्भात आपल्यामध्ये अनेकदा झालेल्या चर्चांनंतर शांततेत आम्ही तुमच्या तक्रारीचं निवारण करत आहोत. आम्ही चित्रपटाचं नाव बदलून ते 'सम्राट पृथ्वीराज' असं करू. आम्ही श्री राजपूत करणी सेना आणि त्यांच्या सदस्यांचं आभार मानतो की, तुम्ही आमच्या चित्रपटासंबंधीच्या भावना समजून घेतल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com