नवरात्रीत अक्षय कुमारने लक्ष्मीच्या रुपात केले पोस्टर रिलीज  

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

लक्ष्मी बॉम्ब. नावच शॉकिंग आणि उत्सुकता निर्माण करणारे आहे. तसाच अक्षय कुमारच्या या नव्या चित्रपटाचा पोस्टरही शॉकिंग आणि उत्सुकता निर्माण करणारा आहे. अक्षयने त्याचा 'कर्म्फट झोन' सोडत लाल साडी नेसत लक्ष्मीचे रुप परिधान केले आहे. 

मुंबई : लक्ष्मी बॉम्ब. नावच शॉकिंग आणि उत्सुकता निर्माण करणारे आहे. तसाच अक्षय कुमारच्या या नव्या चित्रपटाचा पोस्टरही शॉकिंग आणि उत्सुकता निर्माण करणारा आहे. अक्षयने त्याचा 'कर्म्फट झोन' सोडत लाल साडी नेसत लक्ष्मीचे रुप परिधान केले आहे. 

लक्ष्मी बॉम्ब या अक्षय कुमारच्या नव्या चित्रपटाचे पोस्टर आज रिलीज करण्यात आले. लाल रंगाच्या साडीत तो दुर्गेच्या मूर्तीसमोर उभा आहे. दुर्गेच्या या मूर्तीत ती महिशासूराचा वध करताना दिसत आहे. 

''नवरात्र म्हणजे तुमच्यातील देवीला शरण जाणे आणि स्वत:तील अमर्यादीत ताकदीचा सोहळा साजरा करणे. नवरात्रीच्या निमित्ताने मी माझा 'लक्ष्मी' लूक सर्वांसमोर सादर करत आहे. या भूमिकेबद्दल मी खूप उत्सुक आणु त्याचवेळी घाबरलो देखील आहे. पण तुम्ही तुमच्या कर्म्फट झोनच्या बाहेर पडल्यावरच खरे आयुष्य जगू शकता,'' असे कॅप्शन त्याने हे पोस्टर रिलीज करताना दिले आहे. 

दाक्षिणात्य चित्रपट कांचनाचा हा रिमेक असून हा चित्रपट हॉरर कॉमेडी असणार आहे. या चित्रपटाता अक्षयसोबत कियारा अडवाणी असून या चित्रपटाचे दिग्दर्शक राघव लॉरेन्स आहेत. 

या चित्रपटात अक्षयच्या अंगाच तृतीयपंथी व्यक्तीचे भूत शिरणार असून कियारा त्याच्या मैत्रिणीची भूमिका करणार आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akshay Kumar releases poster of Laxmmi Bomb draping a red sari