अक्षयचा 'लखपती किसान' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

अक्षय कुमारची इमेज सध्या सामाजिक चित्रपट करणारा अभिनेता अशी झालेली आहे. ऍक्‍शन हिरो ते सोशल हिरो असा त्याचा प्रवास सुरू झाला आहे. अक्षयला सध्या शेतकरी आणि गाव यावर चित्रपट बनवायचा आहे.

अक्षय कुमारची इमेज सध्या सामाजिक चित्रपट करणारा अभिनेता अशी झालेली आहे. ऍक्‍शन हिरो ते सोशल हिरो असा त्याचा प्रवास सुरू झाला आहे. अक्षयला सध्या शेतकरी आणि गाव यावर चित्रपट बनवायचा आहे.

अक्षय म्हणतो, "मी सध्या शेतकरी आणि गावाशी निगडित कथेवर चित्रपट बनवू इच्छितो. यासाठी मी अनेक लोकांशी बोलणीही केली आहेत. मला समस्येच्या समाधानावर चित्रपट बनवायचा आहे. एका गृहस्थाने त्यांच्या संस्कृतीबद्दल मला सांगितलं की त्यांच्याकडे मुलगी जन्माला आल्यावर 111 झाडे लावली जातात. जर असं प्रत्येकाने केलं तर पर्यावरणासहित इतर अनेक गोष्टींचं समाधान होईल. मनोरंजनासहित असा सामाजिक संदेश देणारा चित्रपट बनणं कठीण आहे. मला शेतकऱ्यांवर चित्रपट करायचा आहे आणि त्यासाठी मला एक छानसं नावही सुचलं आहे, चित्रपटाचं नाव "लखपती किसान' असं ठेवणार आहे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akshay kumar s would be next movie lakhapati kisaan