Akshay Kumar: राज ठाकरेंमुळे मिळाली शिवाजी महाराजांची भूमिका, अक्षयची कबूली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akshay Kumar

Akshay Kumar: राज ठाकरेंमुळे मिळाली शिवाजी महाराजांची भूमिका, अक्षयची कबूली

Akshay Kumar new marathi movie: मराठी प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक मोठी ऐतिहासिक कलाकृती घेऊन येत आहेत. त्या चित्रपटाचे नाव आहे वेडात मराठे वीर दौडले सात... या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याची आता प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता असल्याचे दिसून आले आहे. मांजरेकर यांच्या या प्रोजेक्टची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा होती.

यासगळ्यात चर्चा आहे ती बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या नावाची चर्चा रंगली आहे. त्यानं वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. या भूमिकेविषयी त्यानं प्रतिक्रिया दिली आहे. जी चर्चेत आली आहे. आपल्याला ही भूमिका कोणामुळे मिळाली हे सांगताना अक्षय भावूक झाला होता. त्यानं प्रांजळ कबूली देत चाहत्यांना त्या भूमिकेबद्दल सांगितले आहे.

महेश मांजरेकर दिग्दर्शित वेडात मराठे वीर दौडले सात.. या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा काल पार पडला. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे हे उपस्थित होते. यावेळी आपल्या मनोगतात, अक्षय म्हणाला की, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. या भूमिकेला न्याय देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. शिवरायांची ही भूमिका राज ठाकरे यांच्यामुळे मला मिळाली. ही भूमिका तू करु शकतोस. असं मला राज म्हणाले होते. असं अक्षयनं यावेळी सांगितले.

हेही वाचा: Salman vs Shahrukh: भाईजान Vs किंग खान! कोण जिंकणार?

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची मराठी सिनेसृष्टीत ग्रँड एन्ट्री होणार आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या शिवाजी महाराजांची भूमिका तो साकारणार आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित 'वेडात मराठे वीर दौडले सात' या सिनेमात तो ही भूमिका साकारणार आहे.

हेही वाचा: Shah Rukh Khan: काजोलसोबत 'बेड' सीन, शाहरुखनं तर...