Shah Rukh Khan: काजोलसोबत 'बेड' सीन, शाहरुखनं तर...

शाहरुखच्या बर्थ डे निमित्तानं त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टी आता सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.
Shah Rukh Khan:
Shah Rukh Khan:esakal

Dilwale Dulhania Le Jayenge Trivia: बॉलीवूडचा किंग खान शाहरुखचा आज बर्थ डे आहे. त्यानिमित्तानं सकाळपासूनच चाहत्यांनी त्याला शुभेच्छा देण्यासाठी मन्नत बाहेर गर्दी केल्याचे दिसून आले आहे. बॉलीवूडमध्ये गेल्या तीन दशकांहून अधिक काळ शाहरुखनं आपल्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यत सगळ्यांच्या आवडीचा असणारा हा अभिनेता नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिला आहे.

शाहरुखच्या बर्थ डे निमित्तानं त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टी आता सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. शाहरुख आणि प्रसिद्ध अभिनेत्री काजोल यांची केमिस्ट्री ही अनेकांच्या आवडीची गोष्ट. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी सोबत काम केले. त्यातील कुछ कुछ होता है, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, करण अर्जुन, कभी खुशी कभी गम यानंतर दिलवाले चित्रपटांमधून या दोन्ही सेलिब्रेटींनी नेटकऱ्यांचे, चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र त्यांच्या डीडीएलजे चित्रपटातील त्यांच्या एका सीनवरुन झालेल्या वादाविषयी अनेकांना माहिती नाही.

त्याचे झाले असे डीडीएलजे (दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे) ची शुटींग ही स्वित्झर्लंडमध्ये सुरु होती. बॉलीवूडच्या सर्वोत्तम चित्रपटांमध्ये या चित्रपटाचा नेहमीच समावेश केला होता. या चित्रपटातील एका सीनमध्ये शाहरुख आणि काजोलला बेडसीनला सामोरं जावं लागणार होतं. त्यावेळी शाहरुखनं जे केलं त्याची चर्चा पुन्हा एकदा दिलवाले दुल्हनियाच्या निमित्तानं होताना दिसत आहे. शाहरुखच्या जन्मदिनानिमित्तानं त्याची ती फिल्म पुन्हा एकदा रिलिज करण्यात आली आहे.

Shah Rukh Khan:
Shah Rukh Khan Birthday: आज शाहरुखचा वाढदिवस, रात्रीपासूनच 'मन्नत' बाहेर तुफान गर्दी

1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या त्या चित्रपटानं त्यावेळी मोठी कमाई केली होती. 13 एप्रिल 2007 पर्यत तब्बल सहाशे आठवडे चालणारा चित्रपट म्हणून एक आगळावेगळा विक्रम या चित्रपटानं केला होता. मुंबईतील मराठा मंदिर थिएटरमध्ये हा चित्रपट सुरु होता. शाहरुख आणि काजोलचा जो बेड सीन होता त्यामध्ये शाहरुख नेहमीच काजोलची चेष्टामस्करी करत असे. त्यामुळे आदित्यला तो सीन शुट करताना खूप अडचणी येत होत्या. शाहरुखनं त्याचं शर्ट काढताच काजोल जोरजोरात हसायची. त्यामुळे दिग्दर्शकाची पंचायत व्हायची.

Shah Rukh Khan:
Salman Khan: बॉलीवूडच्या भाईजानला मुंबई पोलिसांकडून 'वाय प्लस' सुरक्षा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com