अक्षय कुमारने कुलभूषण खरबंदा यांच्यासोबत फोटो पोस्ट करत चाहत्यांना दिलं सरप्राईज

दिपाली राणे-म्हात्रे
Wednesday, 2 December 2020

अक्षय त्याच्या फोनमध्ये कुलभूषण खरबंदा यांना काहीतरी दाखवत आहे आणि ते पाहताना दोघेही आनंदी दिसून येत आहेत.

मुंबई- अभिनेता अक्षय कुमारने बुधवारी एक ट्विट करत चाहत्यांना सरप्राईज दिलं आहे. त्याने एक पोस्टर शेअर केलं आहे ज्यामध्ये अक्षय दिग्गज अभिनेते कुलभूषण खरबंदासोबत दिसून येतोय. अक्षयने सोशल साईटवर हा पोस्टर शेअर करत चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.  

हे ही वाचा: कंगनाने बहीण रंगोलील दिलेलं बर्थ डे गिफ्ट पाहुन तुम्हीही पडाल प्रेमात  

अक्षय कुमारने हे पोस्टर सादर करताना लिहिलंय, ''अ फादर-सन सक्सेस स्टोरी मेड इन इंडिया.'' सोबतंच त्याने खाली लिहिलंय, ''पापा चले हरिद्वार, बेटा बांटे पगार.'' पोस्टरवर अक्षय कुमार आणि कुलभूषण खरबंदा खूप आनंदी दिसत आहेत. अक्षय त्याच्या फोनमध्ये कुलभूषण खरबंदा यांना काहीतरी दाखवत आहे आणि ते पाहताना दोघेही आनंदी दिसून येत आहेत.

अक्षयने ट्विट करत लिहिलंय, ''भारतात ज्या प्रकारे व्यापार होतो तो बदलणार आहे. आता बिजनेस स्मार्ट होणार आहे. तुमच्या स्क्रीनवर उद्या ११.३० वाजता येत आहे.'' यासोबत अक्षयने 'मेड इन इंडिया'चा हॅशटॅग दिला आहे. अक्षयचा हा नवीन प्रोजेक्ट नेमका काय आहे याबाबत त्याने पूर्णपणे खुलासा केलेला नाही. असं म्हटलं जातंय की ही कमर्शिअल जाहीरात असू शकते.  

अक्षय कुमारबाबत सांगायचं झालं तर नुकतीच त्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मुंबईत ट्रायडंट हॉटेलमध्ये भेट घेतली. योगी सरकार राज्यात सिने निर्माणला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहेत. अक्षय कुमारने त्यांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं तसंच राज्यात फिल्मसिटीची स्थापन करण्याच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला.

तर योगी आदित्यनाथ यांनी अक्षय कुमारच्या 'टॉयलेट एक प्रेम कथा' या सिनेमाचं कौतुक केलं. ते म्हणाले, ''अक्षयने त्याच्या कलेचा उपयोग करत सिनेमाच्या माध्यमातून समाजाला एक प्रेरणादायक संदेश दिला. असे सिनेमे समाजामध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी मदत करतात.''    

akshay kumar share father son success story poster with kulbhushan kharbanda  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akshay kumar share father son success story poster with kulbhushan kharbanda