'सूर्यवंशी'च्या सेटवर अक्षय कुमार-रोहित शेट्टीमध्ये हाणामारी; व्हिडिओ पाहिला का?

टीम ई-सकाळ
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

एका वृत्तवाहिनीने सूर्यवंशी चित्रपटाच्या शूटिंगप्रसंगी रोहित-अक्षयमध्ये भांडण झाल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि गोलमाल दिग्दर्शक रोहित शेट्टी या दोघांमध्ये काही कारणांवरून हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रोहित शेट्टी दिग्दर्शित करत असलेल्या 'सूर्यवंशी' या चित्रपटात अक्षय कुमार काम प्रमुख अभिनेत्याची भूमिका साकारत आहे. हे दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. मात्र, या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांमध्ये काही कारणांवरून वाद झाल्याची एक बातमी अभिनेत्री कॅटरिना कैफ मोबाईलवर दाखवत असल्याचे या व्हिडिओच्या सुरवातीस दिसते.   

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

कॅटरिना पुढे म्हणते की, रोहित-अक्षयमधील वाद तुम्हीच पाहा. त्यानंतर रोहित-अक्षय एकमेकांशी खोटी हाणामारी करत असल्याचे या व्हिडिओत दिसते. तेव्हा सेटवरील काही क्रू मेंबर्स हे दोघांमधील ही खोटी-खोटी हाणामारी थांबवतात आणि शेवटी रोहित-अक्षय हे ‘हमे लडना पडेगा’ असं म्हणत जमिनीवर पडल्याचे दिसून येते.

हा व्हिडिओ अक्षय कुमारने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. एका वृत्तवाहिनीने सूर्यवंशी चित्रपटाच्या शूटिंगप्रसंगी रोहित-अक्षयमध्ये भांडण झाल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. याला या दोघांनी गोलमाल स्टाईलमध्ये उत्तर देत आपल्या चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. 

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता असलेल्या करण जोहरनेही या दोघांमध्ये झालेल्या वादाची दखल घेतली आहे. 'रोहित-अक्षयच्या भांडणात मी मध्यस्थी करू शकत नाही,' अशी मजेशीर प्रतिक्रिया करणने दिली आहे. 

- आयुष्यमान खुराना : सलग सात सुपरहिट सिनेमे देणारा बॉलिवूडचा 'रायझिंग सुपरस्टार'

अक्षय कुमारचा 'हाऊसफुल 4' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. सध्या तो रोहित शेट्टीसोबत सूर्यवंशी या चित्रपटाचे शूटिंग करत असून हा रोहितसोबतचा पहिलाच अॅक्शन मूव्ही आहे.

रोहित शेट्टीने या अगोदर अजय देवगणसोबत सिंघम, सिंघम रिटर्न आणि रणवीर सिंगसोबत सिम्बा हे अॅक्शन मूव्ही केले असून सूर्यवंशी हा या सीरिजमधील चौथा चित्रपट आहे. हा चित्रपट पुढील वर्षी रमजान ईदला प्रदर्शित होणार आहे. मात्र, रोहित-अक्षयच्या फॅन्सना आतापासूनच या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akshay Kumar shared video on twitter of his fallout with Sooryavanshi director Rohit Shetty