esakal | अक्षय कुमार फोन चार्ज करण्यासाठी शोधत होता चार्जर पॉईंट, मग पाहा काय झालं...
sakal

बोलून बातमी शोधा

akshay kumar

अक्षय अनेकदा मजेशीर पोस्ट करत असतो. आता पुन्हा एकदा त्याने अशीच एक पोस्ट केली आहे.

अक्षय कुमार फोन चार्ज करण्यासाठी शोधत होता चार्जर पॉईंट, मग पाहा काय झालं...

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- अक्षय कुमार केवळ सिनेमातूनंच नाही तर सोशल मिडियाच्या माध्यमातून देखील चाहत्यांचं मनोरंजन करण्याची संधी सोडत नाही. ट्विटर, इंस्टाग्रामवर त्याची खूप जास्त फॅन फॉलोईंग आहे. तो अनेकदा यावर मजेशीर पोस्ट करत असतो. आता पुन्हा एकदा त्याने अशीच एक पोस्ट केली आहे. अक्षय कुमारने चार्जिंगच्या सॉकेटचा फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये बेडूक दिसून येतोय. 

हे ही वाचा: बॉलीवूडमधील हिरो-हिरोईनमधील मानधनावर अनिल कपूर यांचा खुलासा, बेबोला म्हणाले 'तु तर माझ्याकडून खूप पैसै घेतले'  

अक्षय कुमारने हा फोटो शेअर करत कॅप्शन दिलं आहे की, 'फोन चार्ज करण्यासाठी जागा शोधत होतो. असं वाटतंय मला कोणतीतरी दुसरी शोधैावी लागेल. ही जागा तर पूर्णपणे भरलेली आहे. ' अक्षयने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये चार्जिंग शॉकेटच्या आतल्या जागेत बेडूक बसलेला दिसून येतोय.

अक्षयने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सुर्याचा व्हिडिओ पोस्ट केला होता. अक्कीने सोबत गायत्री मंत्र देखील गायला होता. त्याने लिहिलंय होतं की, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जे आज सकाळी हा नजारा पाहू शकले नाहीत. अक्षयच्या सिनेमांबाबत सांगायचं झालं तर त्याने नुकतंच 'अतरंगी रे' सिनेमाचं शूट पूर्ण केलं आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक आनंद एल राय आहेत. आनंद यांना नुकतीच कोरोना झाल्याची माहिती त्यांनी सोशल मिडियावर शेअर केली होती. अक्षय कुमार 'अतरंगी रे' सिनेमाव्यतिरिक्त 'बेल बॉटम', 'बच्चन पांडे', 'रक्षा बंधन', 'पृथ्वीराज', 'सूर्यवंशी' या सिनेमात दिसून येणार आहे.    

akshay kumar shares hilarious photo of charging point  

loading image