बॉलीवूडमधील हिरो-हिरोईनमधील मानधनावर अनिल कपूर यांचा खुलासा, बेबोला म्हणाले 'तु तर माझ्याकडून...'

दिपाली राणे-म्हात्रे
Saturday, 2 January 2021

अनिल कपूर यांनी या शो यादरम्यान अनेक गंभीर मुद्द्यांवर बातचीत केली ज्यामध्ये  बॉलीवूडमधील हिरो आणि हिरोईन यांना मिळत असलेल्या मानधनामध्ये खूप अंतर असलेल्या मुद्द्याचा समावेश होता. 

मुंबई- बॉलीवूडची बेबो म्हणजेच करिना कपूर सध्या तिच्या प्रेग्नंसीचा काळ एन्जॉय करत आहे. यासोबतंच की तिच्या कामावरही तेवढंच लक्ष ठेवून आहे. करिना तिच्या चॅट शोमध्ये अनेक सेलिब्रिटींच स्वागत करताना दिसतेय. नुकतंच तिने या शोमध्ये बातचीत करण्यासाठी दिग्गज अभिनेता अनिल कपूर यांना बोलावलं होतं. अनिल कपूर यांच्यासोबत सिने दिग्दर्शक अनुराग कश्यप देखील होते. यादरम्यान अनेक गंभीर मुद्द्यांवर त्यांनी बातचीत केली ज्यामध्ये  बॉलीवूडमधील हिरो आणि हिरोईन यांना मिळत असलेल्या मानधनामध्ये खूप अंतर असलेल्या मुद्द्याचा समावेश होता. 

हे ही वाचा: सुशांतच्या मृत्युमुळे रियाच्या बॉलीवूड करिअरला लागला ब्रेक, २०२१ मध्ये होणार का एंट्री?  

करिना कपूरचा चॅट शो व्हॉट वीमेन वॉन्टमध्ये अनिल कपूर त्यांच्या एके वर्सेस एकेचे सहकलाकार अनुराग कश्यप यांच्यासोबत पोहोचले. या दरम्यान करिनाने बॉलीवूडमधील हिरो आणि हिरोईन यांना मिळणारं मानधन यांच्यातील अंतर या मुद्द्यावर प्रश्न विचारत म्हटलं की हॉलीवूडच्या कलाकारांनी स्टँड घेतला आणि म्हटलं की ते सिनेमात तेव्हाच काम करतील जेव्हा त्यांच्या फिमेल कोस्टारला त्यांच्याबरोबरीचं मानधन मिळेल. बॉलीवूड अभिनेत्यांनी देखील असंच केलं पाहिजे का?

हे ऐकून अनिल कपूर म्हणाले, तु तर माझ्याकडून खूप पैसे घेतले आहेस.अनिल कपूर यांचं हे उत्तर ऐकून करिनाला हसू फुटलं आणि ती म्हणाली, आम्ही तर हे बॅरिअर तोडत आहोत आम्ही हे करत आहोत. मात्र जसं तुम्ही म्हणालात असे खूपजण आहेत ज्यांना याविषयी जाणून घेण्याची गरज आहे.

अनिल कपूर यांनी या शोदरम्यान 'विरे दी वेडिंग' सिनेमा दरम्यान करिनासोबत करत असलेल्या मानधनामध्ये कमी जास्त करण्याबाबतची गोष्ट सांगताना म्हणाले, 'मला निर्मात्यांचा फोन आला की यार ही तर हिरोपेक्षा जास्त मानधन मागत आहे. मी म्हणालो देऊन टाका, बेबो जे मागेल ते देऊन टाका. त्यांनी हे देखील म्हटलं, स्त्री सहकलाकारापेक्षा कमी मानधन घेण्याविषयी काहीही अडचण नाहीये. हे अनेकदा झालं आहे. असे अनेक सिनेमे आहेत ज्यामध्ये मुख्य अभिनेत्रीने जास्त पैसे घेतलेत आणि मी आनंदाने दिले आहेत.'   

anil kapoor talks about pay parity in bollywood says kareena kapoor took a lot of money from him  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anil kapoor talks about pay parity in bollywood says kareena kapoor took a lot of money from him