
Akshay चा सेटवरच्या वॅनिटी व्हॅन विषयी मोठा खुलासा, म्हणाला,'कलाकार तिथे..'
Akshay Kumar: अक्षय कुमारला बॉलीवूडचा सगळ्यात बिझी अभिनेता म्हणून ओळखलं जातं. एकामागे एक सिनेमे तो साइन करताना दिसतो. यामुळे अनेकदा त्याच्यावर मीम्सही बनतात. त्याला अनेकजण सल्ले देतात की,त्याने कमी सिनेमे करावेत. आता अक्षय कुमारने सांगितलं आहे की, तो जेवढे सिनेमे करतो,तेवढीच जास्त सुट्टी देखील एन्जॉय करतो. आता सध्या अक्षय त्याच्या रक्षाबंधन(Rakshabandhan) सिनेमामुळे चर्चेत आहे.(Akshay Kumar Tells, Why he signs back to back Movies, And he not waste time like other actors)
हेही वाचा: Riteish-जिनिलियाचा सिनेमा,ज्यामुळे हादरलेली मुख्यमंत्र्यांची खुर्ची
अक्षय कुमार बॉलीवूडचा असा अभिनेता आहे,जो बॅक टू बॅक सिनेमे करताना दिसतो. आता गेल्या काही महिन्यांमध्ये प्रदर्शित झालेले त्याचे सिनेमे चालले नाहीत ही वेगळी गोष्ट. बच्चन पांडे नंतर सम्राट पृथ्वीराज देखील थिएटरमध्ये चालला नाही. आता अक्षयला रक्षाबंधन सिनेमाकडून खूप आशा आहेत.
हेही वाचा: 'आईला ऐनवेळी लक्षात आलं म्हणून,नाहीतर मी...',दीपिका पदूकोण डोकावली भूतकाळात
अक्षय कुमारने एका इंग्रजी वेबसाईटला मुलाखती दरम्यान सांगितले आहे की,''माझ्या पूर्ण करिअरमध्ये सुरुवातीला लोक मला सांगायचे की एका वर्षात मी ४ सिनेमांमध्ये काम करु नये. लोकांनी नेहमीच मला सल्ला दिला की सिनेमात काम करायची किंवा त्यांच्या निर्मितीची संख्या मी कमी करावी. पण मला इथे आवर्जुन सांगायला आवडेल की इंडस्ट्रीतल्या इतर सगळ्यांच्या तुलनेत मी जास्त सुट्ट्यांचा आनंद घेतो, मी रविवारी कधीच काम करत नाही. आणि शनिवारी मी अर्धा दिवस काम करतो''.
हेही वाचा: Laal singh Chaddha फ्लॉप होईल तर 'या' कारणानं, आमिरने व्यक्त केली भीती...
अक्षय पुढे म्हणाला की,''मी सिनेमाच्या सेटवर ८ तास घालवतो पण एक मिनिटही मी इतर कलाकारांसारखे वॅनिटी व्हॅनमध्ये जाऊन बसत नाही. मी सिनेमाच्या सेटवरच राहतो. माझे ८ तास,दुसऱ्या कलाकारांच्या १४ ते १५ तासांइतकेच आहेत. सिनेमांसोबत माझी कमिटमेंट असते आणि ती पूर्ण करण्यात मी कुठेच कमी पडत नाही''.
Web Title: Akshay Kumar Tells Why He Signs Back To Back Movies And He Not Waste Time Like Other
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..