Akshay Kumar: 'मी बॉलीवूडमध्ये आलो तेव्हा तुझा जन्म झाला टायगर'|Akshay Kumar latest news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akshay Kumar-Tiger Shroff

Akshay Kumar: 'मी बॉलीवूडमध्ये आलो तेव्हा तुझा जन्म झाला टायगर'

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) लवकरच आणखी एक अॅक्शन हिरो टायगर श्रॉफसोबत (Tiger Shroff) स्क्रीन शेअर करणार आहे. दोघेही 'बडे मियाँ छोटे मियाँ' (Bade Miyan Chote Miyan) या चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट 24 वर्षांपूर्वी 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि गोविंदा (Govinda) स्टारर चित्रपट बडे मियाँ छोटे मियाँचा रिमेक असेल. पुढील वर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी दावा केला आहे की हा सर्वात मोठा अॅक्शन मनोरंजन चित्रपट असेल.

या चित्रपटाची घोषणा होण्यापूर्वीच 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाच्या रिमेकची घोषणा होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात होती. टायगर श्रॉफने एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये अमिताभ आणि गोविंदाच्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटातील काही दृश्ये दाखवण्यात आली होती आणि सांगितले की 24 वर्षांपूर्वी आम्ही दोन दमदार कलाकारांना एकत्र आणले होते. त्याचसोबत आता मोठी घोषणा होणार असल्याचेही तो म्हणाला. तेव्हापासून या चित्रपटाच्या रिमेकबाबत चर्चा होत आहे.

सध्या, अक्षय कुमारचे एक ट्विट (Tweet) चर्चेचा विषय बनले आहे. या ट्विटमध्ये त्याने टायगर श्रॉफला लिहिले आहे की, ज्या वर्षी तुझा जन्म झाला, त्याच वर्षी मी चित्रपटांमध्ये पदार्पण केले. तरीही, तुला माझ्यासोबत स्पर्धा करायची आहे का? चला तर मग, थोडी अॅक्शन करू.

हेही वाचा: Oscar Nominations 2022: आज जाहीर होणार, कधी आणि कुठे प्रसारित होणार?

अक्षय आणि टायगर पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग पुढच्या वर्षी सुरू होणार आहे. अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar) या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Akshay Kumar Tiger Shroff In Bade Miyan Chote Miyan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..