'वेलकम' ची 14 वर्षे , अजून पैसे दिले नाहीत स्नेहलची खंत

याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
snehal daabbi
snehal daabbi team esakal

मुंबई - अक्षय कुमारचा (akshay kumar) प्रसिद्ध चित्रपट वेलकम (welcome movie) याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. बॉक्स ऑफिसवर त्यानं चांगली कमाई केली. सध्या या चित्रपटाच्या बाबत एक मोठा खुलासा या चित्रपटात भूमिका केलेल्या एका अभिनेत्यानं केली आहे. त्या अभिनेत्याचे नाव स्नेहल दाबी असं आहे. त्यानं जे काही सांगितलं आहे त्यावरुन बॉलीवूडमधील इंडस्ट्री कशाप्रकारे चालते आणि त्यातील वास्तव या गोष्टी समोर आल्या आहेत. मला माझे पैसे मिळाले नाहीत. अशी खंत त्या अभिनेत्यानं व्यक्त केली आहे. ( akshay kumar welcome snehal daabbi accused producer firoz nadiadwala for not paying his fees from 14 years)

2007 मध्ये अभिनेता स्नेहल दाबी (snehal daabbi) याने वेलकम चित्रपटामध्ये एक विनोदी भूमिका साकारली होती. त्यात अनिल कपूर (anil kapoor), अक्षय कुमार (akshay kumar), नाना पाटेकर (nana patekar), कॅटरिना कैफ, परेश रावल हे कलाकार होते. स्नेहलच्या वाट्याला काही महत्वाची भूमिका नव्हती. मात्र त्यानं जी भूमिका साकारली त्यामुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला. त्यानं त्या चित्रपटाविषयीच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. तो म्हणाला, गेल्या 14 वर्षांपासून मला त्या चित्रपटाचे मानधन मिळालेले नाही. बॉलीवूड हंगामाशी बोलताना त्यानं ही आठवण सांगितली आहे.

अभिनेता स्नेहल दाबीनं सांगितलं, मी फसलो गेलो, तेव्हा माझ्या मदतीला कोणी आलं नाही. आताही कुणीही आलेलं नाही. बॉलीवूड इंडस्ट्री मोठी अजब आहे. त्याबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. यापुढील काळात समजा मला फिरोज नाडियावाला यांनी मला दहा कोटी रुपये दिले आणि चित्रपटात काम करण्यास सांगितलं तरी मी ते काम करणार नाही. त्याचं काय आहे की, फिरोज भाई हे पहिल्यांदा शब्द देतात. आणि पुन्हा आपल्या शब्दापासून पळ काढतात. त्याचा मला मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागला आहे.

snehal daabbi
दागिने, घरातील सामान विकण्याची अभिनेत्रीवर आली वेळ; सोनू सूदकडेही मागितली मदत

स्नेहल यांचे म्हणणे आहे की, वेलकम ही केवळ एकच फिल्म नाही की ज्यात मला तोटा सहन करावा लागला. याशिवाय नाडियावाला यांनी संजय दत्त आणि विवेक ऑबेरॉय यांच्या शेर नावाच्या चित्रपटाची देखील शुटिंग काही अंशी पूर्ण केली होती. विशेष म्हणजे त्या चित्रपटाची 85 टक्के शुटिंग पूर्ण झाली असताना देखील त्याचे पैसे मिळालेले नाहीत. पुढे तो चित्रपट पूर्ण झाला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com