esakal | दागिने, घरातील सामान विकण्याची अभिनेत्रीवर आली वेळ; सोनू सूदकडेही मागितली मदत
sakal

बोलून बातमी शोधा

Shagufta Ali

दागिने, घरातील सामान विकण्याची अभिनेत्रीवर आली वेळ; सोनू सूदकडेही मागितली मदत

sakal_logo
By
स्वाती वेमूल

कोरोना महामारी, लॉकडाउन यांचा फटका सर्वच श्रेत्रांना बसला. मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांवर आर्थिक संकट कोसळलं. अनेक मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शगुफ्ता अली Shagufta Ali गेल्या चार वर्षांपासून आर्थिक संकटांना तोंड देतेय. कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे काम बंद असल्याने बचतीचे सर्व पैसे संपल्याचं त्यांनी सांगितलं. शगुफ्ता यांनी अभिनेता सोनू सूदकडेही मदतीची मागणी केली आहे. १९९८-९९ मध्ये 'सांस' या मालिकेतील त्यांची भूमिका विशेष गाजली होती. 'परंपरा', 'जुनून' आणि 'द झी हॉरर शो' यांमध्येही त्या झळकल्या. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शगुफ्ता त्यांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल व्यक्त झाल्या. (Shagufta Ali says she sold off car and jewellery due to financial woes)

गेल्या काही वर्षांत आर्थिक परिस्थिती खालावल्याने कार आणि दागिने विकल्याचंही त्यांनी सांगितलं. "गेल्या चार वर्षांत काम कमी झाल्याने मला आर्थिक समस्या जाणवू लागल्या. कामच मिळत नसल्याने मी कार आणि दागिने विकून कसंबसं घर चालवत होती. पहिल्या दोन-तीन वर्षांत मी माझ्या परीने गोष्टी हाताळण्याचा प्रयत्न केला. मात्र गेल्या वर्षभरात परिस्थिती आणखीनच खालावली. मी जमा केलेले सर्व पैसे संपले. खरंतर मला कोणाकडेच पैसे मागायचे नव्हते. पण महामारीमुळे गोष्टी अजूनच कठीण झाल्या. गेल्या चार वर्षांपासून मी त्रास सहन करतेय. गेल्या वर्षभरात जेवढी लोकांची वाईट परिस्थिती झाली, तेवढी माझी गेल्या चार वर्षांत झाली", असं त्या म्हणाल्या.

हेही वाचा: "मुख्यमंत्र्यांनी राजू सापतेंच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा"

शगुफ्ता यांनी सोनू सूदकडेही मदत मागितली. मात्र त्याच्या फाऊंडेशनने आर्थिक खर्चासाठी मदत करण्यास नकार दिला. CINTAA या संस्थेनंही शगुफ्ताची मदत करण्यासाठी हात पुढे केला. मात्र ते देत असलेली रक्कम तुटपूंजी असल्याने शगुफ्ता यांनी ती नाकारली.

२० वर्षांपूर्वी कॅन्सरचा सामना केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. "सांस मालिकेच्या शूटिंगदरम्यान मला आरोग्याचा त्रास होऊ लागला. तरीसुद्धा मी माझे सर्व शूट पूर्ण केले. शस्त्रक्रिया झाल्यानंतरही मी दुबईला शूटिंगसाठी गेले होते. त्यावेळी मी तीन ते चार शूट्स एकत्र करायचे. शरीरावर शस्त्रक्रियांचे टाके असतानाही मी काम केलं", असं त्यांनी सांगितलं. २०१८ मध्ये त्यांनी 'बेपनाह' या मालिकेत काम केलं होतं.

loading image