
मुंबई: दिग्गज बॉलिवुड अभिनेता अक्षय कुमार हा इतर अभिनेत्यांच्या तुलनेत एका वर्षामध्ये सर्वाधीक चित्रपटात काम करतो, त्यामुळेच नुकत्याच प्रसिध्द झालेल्या फोर्ब्स मॅगझीनच्या सर्वाधीक कमाई करणाऱ्या सेलिब्रेटींच्या यादीत स्थान मिळवणारा अक्षय कुमार हा एकमेव भारतीय ठरला होता. मात्र सध्या त्याची कमाईत देखील घट झाली असेल. कोरोना व्हायरसचा वाढता फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्याने चित्रपट प्रदर्शित होणे तसेच शुटींगसह इतर सर्व कामे बंद पडली असून सध्या अक्षयचे सात वेगवेगळे चित्रपट अडकून पडले आहेत.
अक्षयचा पुढील चित्रपट ‘सुर्यवंशी’ हा करोना व्हायरसमुळे सिनेमागृह बंद असल्याने प्रदर्शीत होण्याची वाट पाहत आहे. लॉकडाऊनच्या काळात सरकारने सर्व सिनेमागृह बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे चित्रपट रिलीज स्थगीत करण्यात आले आहेत. तसेच अक्षयच्या आगामी काळात येणाऱ्या चित्रपटांचे शुटींग देखील बंद पडले असून अक्षय ते लवकरात लवकर करण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्र सरकारने 15 जून पासून काही नियमांचे पालन करत चित्रपटांचे शुटींग करण्यास परवानगी दिली आहे.
अक्षय कुमार लॉकडाऊन नंतर काम सुरु करताना पहिल्यांदा त्याचा आगामी चित्रपट ‘बेल बॉटम’ याची लंडनमध्ये शुटींग सुरु करणार आहे. येत्या जुलै महिन्यापासून लंडन येथे हा चित्रपट शूट केला जाणार आहे. बिग बजेट असणारा हा चित्रपच रंजीत तिवारी दिगदर्शीत करणार आहेत. लॉरडाऊन संपल्यानंतर थिअटर प्रेक्षकांसाठी खुले करण्यात आल्यावर अक्षय कुमार याच्या ‘सुर्यवंशी’ या चित्रपटासोबतच ‘लक्ष्मी बम’ हा चित्रपट देखील रिलीज होण्यासाठी तयार झालेला असेल. ‘लक्ष्मी बम’ या चित्रपटात कियारा आडवाणी देखील काम करणार आहे.‘बेल बॉटम’ सोबतच अक्षय लवकरच आनंद एल राय यांचा पुढील चित्रपट 'अतरंगी रे' याच्या शुटींगला देखील लवकरच सुरुवात करणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.