esakal | अक्षय कुमार वसवणार ट्रान्सजेंडर्ससाठी घरं!
sakal

बोलून बातमी शोधा

Akshay Kumar will built homes for Transgender

अक्षयचा आगामी लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट देखील ट्रान्सजेंडरच्या आयुष्यावर बेतलेला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक राघव लॉरेन्स व अक्षय या दोघांनी ट्रान्सजेंडर्सना मदत करायचे ठरविले. ते दोघं खुद्द ट्रान्सजेंडर्ससाठी घरे उभी करणार आहेत. अक्षय व राघव यांनी एकत्र येऊन विचार केला व हा उत्तम निर्णय घेतला आहे. चेन्नईत ही घरे उभारली जातील.

अक्षय कुमार वसवणार ट्रान्सजेंडर्ससाठी घरं!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

खिलाडी अक्षय कुमार सध्या चित्रपटांमध्ये धुमाकूळ घालतोय. त्याच्या आगामी लक्ष्मी बॉम्ब आणि सूर्यवंशी या चित्रपटाची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. पण अक्षय अजून एका कारणासाठी चर्चेत आहे, ते म्हणजे त्याने ट्रान्सजेंडर्सला मदत करण्याचे ठरविले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

अक्षयचा आगामी लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट देखील ट्रान्सजेंडरच्या आयुष्यावर बेतलेला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक राघव लॉरेन्स व अक्षय या दोघांनी ट्रान्सजेंडर्सना मदत करायचे ठरविले. ते दोघं खुद्द ट्रान्सजेंडर्ससाठी घरे उभी करणार आहेत. अक्षय व राघव यांनी एकत्र येऊन विचार केला व हा उत्तम निर्णय घेतला आहे. चेन्नईत ही घरे उभारली जातील. यासाठी अक्षय कुमार १.५ कोटी रूपये देणार आहे. याची घोषणा राघवने स्वतः फेसबुकवर केली. 

'मी तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगू इच्छितो. भारतात पहिल्यांदाच ट्रान्सजेंडर्ससाठी घरे बांधण्याकरीता अक्षय कुमार सरांनी १.५ कोटी रुपये दान केले आहेत' असे राघवने फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. राघव स्वतः एक चॅरिटेबल ट्रस्ट चालवतो याद्वारे तो दिव्यांगांना मदत, लहान मुलांचे शिक्षण, त्यांना राहायला निवारा अशा सोयी देतो. चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय व राघवला ट्रान्सजेंडर्ससाठी काहीतरी उपयुक्त करायचे होते, यासाठी त्यांनी घरे बांधण्याचा निर्णय घेतला.  

- 'बिग बॉस 13' नंतर पारस-माहिरा बनले नवरा नवरी..सोशल मिडीयावर झळकले फोटो

ट्रान्सजेंडर भूतावर आधारित असलेला लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट ५ जूनला रिलीज होईल. 'कंचना २' चा हा रिमेक आहे.  

loading image
go to top