..या अभिनेत्याच्या नावावर आहे कॅनडामध्ये पूर्ण टेकडी 

वृत्तसंस्था
Monday, 9 September 2019

बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये अक्षय कुमारचं नाव आवर्जुन घेतलं जातं. आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे.

मुंबई : संघर्षातून बॉलिवूडचा स्टार बनलेला अभिनेता म्हणजे अक्षय कुमार होय. आज तो बॉलिवूडच्या टाॅप 5 स्टारमध्ये आहे. हा अभिनेता आपल्या फिटनेसबाबतीतही फार जागरुक असतो. बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये अक्षय कुमारचं नाव आवर्जुन घेतलं जातं. आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने बॉलिवूडमध्ये २९ वर्षांच्या करिअरमध्ये आतापर्यंत १०० हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्याचा स्वतःचा असा एक चाहता वर्ग तयार झाला आहे.

दरम्यान, अक्षयचं खरं नाव राजीव ओम भाटिया आहे हे तर साऱ्यांनाच माहीत आहे. सिनेमांत येण्यापूर्वी त्याने आपलं नाव अक्षय कुमार असं केलं. अक्षयचा जन्म अमृतसरमध्ये झाला असला, तरी तो लहानाचा मोठा चांदनी चौकमध्ये झाला. मुंबई, कलकत्ता, थायलंड येथे आपलं नशीब आजमावल्यानंतर अक्षयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. २००१ मध्ये त्याने अभिनेत्री ट्विंकल खन्नाशी लग्न केलं. दोघांना दोन मुलं आहेत. 

महागड्या गाड्या- 
अक्षयकडे रॉयस फॅंटॉम (सुमारे ८.९ कोटी), बेंटले कॉन्टिनेंटल फ्लाइंग स्पूर (सुमारे ३.२१ कोटी), पोर्श केयने (सुमारे १. ४ कोटी) आणि रेंज रोवर वोग (सुमारे २.७५ कोटी) या हाय क्लास गाड्या आहेत.

मानधनाबाबत - 
फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, अक्षयने २० ब्रँड साइन केले. तर लाइव्ह मिन्टने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, प्रत्येक जाहिरातीच्या दर दिवसाच्या चित्रीकरणासाठी १ ते १.५ कोटी रुपये घेतो. तर रसना या ब्रँडने १८ कोटी रुपयांत तीन वर्षांचं डिल अक्षयसोबत केलं. अक्षय कुमार प्रत्येक सिनेमासाठी साधारणपणे ३० कोटी रुपये मानधन घेतो. तर काहीवेळा अक्षयने प्रत्येक दिवसासाठी १ कोटी रुपये मानधन घेतल्याच्याही चर्चा झाल्या होत्या.

इतर मालमत्ता - अक्षय कुमारने हरी ओम एण्टरटेनमेन्ट आणि ग्रेझिंग गोट पिक्चर्स या दोन प्रोडक्शन हाउस सुरू केल्या. या प्रोडक्शन अंतर्गत त्याने 'रुस्तम', 'पॅडमॅन' आणि 'ओह माय गॉड' या सिनेमांची निर्मिती केली. याशिवाय जुहूमध्ये अक्षय आणि ट्विंकलचं समुद्र किनारी एक घर आहे. तसेच मॉरिशसमध्ये समुद्र किनारी मालमत्ता, टोरंटोमध्ये एक बंगला, कॅनडामध्ये एक टेकडी आणि अंधेरीमध्ये चार घरं आहे. विशेष म्हणजे या चार घरांची प्रत्येकी किंमत साधारणपणे ४.५ कोटी ते ५ कोटी रुपये इतकी आहे.

इतर संपत्ती- अक्षयकडे हार्ले डेव्हिडसन व्ही-रॉड, प्रायव्हेट जेट आहे. याशिवाय तो वर्ल्ड कबड्डी लिगचा मालक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akshay kumars birthday net worth property expensive cars family bike andheri flats