Akshay Kumar: 'कुणाची लागली नजर' अक्षय कुमार ठरला फ्लॉप चित्रपटांचा बादशाह... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akshay Kumar

Akshay Kumar: 'कुणाची लागली नजर' अक्षय कुमार ठरला फ्लॉप चित्रपटांचा बादशाह...

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा त्याच्या अ‍ॅक्शन आणि कॉमेडीचा किंग आहे. त्याचं खास वैशिष्टय म्हणजे जिथे इतर बॉलिवूड स्टारचे वर्षभरात क्वचित एक सिनेमा येतो तिथे अक्षयचे दोन तिन सिनेमे प्रदर्शित होऊन तिसऱ्याची शुटिंगही सुरु असते.

ते वर्षभर पडद्यावरचा स्टार असतो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून अक्षय कुमारचे नशीब त्याला फारशी साथ देतांना दिसत नाहीये. कारण बॉक्स ऑफिसवर त्यांची जादू दिसत नाही आहे.

याचाच परिणाम असा की, गेल्या एका वर्षात अक्षयने थिएटरमध्ये 5 फ्लॉप चित्रपट दिले आहेत. नुकताच अक्षयचा सेल्फी हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. पण हा चित्रपट तर त्याच्या बाकी चित्रपटांपेक्षाही सर्वात कमी व्यवसाय करणारा चित्रपट ठरला आहे. त्याचा हा सेल्फी बॉक्सऑफिसवर ब्लर झाला.

२०२१ मध्ये रोहित शेट्टी दिग्दर्शित सूर्यवंशी या चित्रपटानंतर अक्षयचा एकही चित्रपट हिट झालेला नाही. अक्षयचा सेल्फी रिलीज होण्याचा आज चौथा दिवस आहे. मात्र हा चित्रपट अजून 10 कोटींचीही कमाई करू शकला नाही. अशा परिस्थितीत आता अक्षय कुमारच्या करियरवर याचा गंभीर परिणाम होणार असल्याच दिसतयं.

बच्चन पांडे (Bachchan Pandey) - 18 मार्च

बच्चन पांडे (Bachchan Pandey) - 18 मार्च

बच्चन पांडे:

अक्षयला बच्चन पांडे या चित्रपटाकडून खूप आशा होत्या, पण बच्चन पांडेच्या रिलीज झाला आणि तो दणक्यात आपटला. त्याबरोबरच त्याच्या फ्लॉप सिनेमांची मालिकाच अशी सुरू झाली. द काश्मीर फाइल्ससमोर बच्चन पांडे टिकू शकला नाही.

सम्राट पृथ्वीराज -

सम्राट पृथ्वीराज -

सम्राट पृथ्वीराज:

'साम्राज पृथ्वीराज' या चित्रपटाबद्दल अक्षय आणि त्याच्या चाहत्यांना खूप अपेक्षा होत्या, लोक हा ऐतिहासिक चित्रपट पाहायला नक्कीच जातील असा विश्वास त्यांना होता. इतकच नव्हे तर या चित्रपटातून मानुषी छिल्लरही डेब्यू करत होती. तीनशे कोटी रुपयांचे बजेट असणाऱ्या या चित्रपटानं शंभर कोटींचा आकडाही पार केला नसल्याची माहिती पुढे आली. बिग स्टार कास्ट असूनही त्याचा प्रभाव फिका पडला. हा चित्रपटही फ्लॉप झाला, पण मानुषीच्या पदार्पणानेही बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी दाखवली नाही.

Rakshabandhan Review

Rakshabandhan Review

रक्षाबंधन:

2022 मध्ये, रक्षाबंधन सणाच्या खास निमित्ताने अक्षयने चाहत्यांना या चित्रपटाने भेट दिली. चित्रपटाची कथा तर लोकांना आवडली. पण हा चित्रपट पाहण्यासाठी फार कमी लोक थिएटरमध्ये पोहोचले.

Cuttputlli

Cuttputlli

कठपुतली:

बॅक टू बॅक तीन सिनेमे फ्लॉप गेल्यानंतर, अक्षयने त्याच्या पुढच्या चित्रपटासाठी ओटीटीची निवड केली. अभिनेत्याचा कठपुतली हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटाला समिंश्र प्रतिक्रिया मिळल्या. हा चित्रपट चाहत्यांना फारसा आवडला नाही.

Ram Setu

Ram Setu

राम सेतू:

रामसेतू हा चित्रपटही त्यापैकीच एक आहे. त्याची अवस्थाही कोणापासून लपलेली नाही. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. रामसेतूमध्ये अक्षयसोबत जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.

टॅग्स :movieakshay kumar