
Linkedin Blocked Sunny Leone: 'तू खरी सनी लियोनी नाय' म्हणत ब्लॉक केलं अकाउंट... व्हिडिओ व्हायरल
Linkedin Blocked Sunny Leone: बॉलिवूडची 'बेबी डॉल' म्हणुन ओळखली जाणारी सनी लिओनी हि तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त अनेक वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असते. सनी ही तिच्या कामात व्यस्त असते. ती कधी म्यूजिक अल्बममध्ये तर कधी फॅशन शओ मध्येही दिसते.
अलीकडेच तिने स्वतःचा परफ्यूम आणि कॉस्मेटिक ब्रँड लॉन्च केला आहे. ही अभिनेत्री लिंक्डइनच्या माध्यमातून समुदायाशी जोडली गेली होती.
सनी ही सोशल मिडियावरही सक्रिय आहे. ती नेहमी तिच्या चाहत्याच्या संपर्कात राहते. त्याच वेळी, चाहत्यांना देखील त्यांच्या आवडत्या स्टारशी संबंधित सर्व काही जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे. मात्र आज तिच्यासोबत एक विचित्र प्रकार घडलाय. याची माहिती खुद्द तिने चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
त्याच झालं असं की, लिंक्डइनने सनी लिओनीचे खातं ब्लॉक केलं आहे. याबाबत सनीने तिच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या प्रकरणाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती म्हणते, 'लिंक्डइनवर एक महिना मस्त वेळ घालवल्यानंतर त्यांनी माझं खातं ब्लॉक केले, त्यांना वाटलं की ही खरी सनी लिओनी नाही आहे पण ती मीच आहे.'
पुढे सनी म्हणते, 'माझ्या खात्यावर खूप ट्रॅफिक होते हे मला समजले आहे, पण फक्त हे कारण काढून माझं पेज काढणं योग्य नाही. हे खूप वाईट आहे... मला आशा आहे की ते त्यांचा निर्णय बदलतील, हा निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी मला माहिती दिली नाही किंवा मला ईमेलही केलेला नाही.
व्हिडिओमध्ये, ती पुढे म्हणते की लिंक्डइनशी जोडलं जाणं ही एक चांगली भावना होती, म्हणून जर कोणाकडे तिच्यासाठी काही सल्ला असेल तर ते उपयुक्त ठरेल.
तिने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर तिच्या अनेक चाहत्यानी तिला पाठिंबा दिला आहे. तिच्या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अनेक युजर्सने नाराजीही व्यक्त केली आहे.
सनी लिओनी सध्या तिच्या आगामी 'कोटेशन गँग' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सनी लिओनीशिवाय जॅकी श्रॉफही कोटेशन गँगमध्ये दिसणार आहे.