esakal | अरुणा भाटिया यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पोहोचले बॉलिवूड कलाकार
sakal

बोलून बातमी शोधा

Akshay Kumars mother Aruna Bhatias funeral Twinkle Khanna daughter Nitara and bollywood celebs attend

अरुणा भाटिया यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पोहोचले बॉलिवूड कलाकार

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांनी बुधवारी (८ सप्टेंबर) सकाळी मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने त्यांना सहा दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली. जुहूमधील स्मशानभूमीत अरुणा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. त्यांचा अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली आहे.

अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना आणि मुलगी नितारासुद्धा याठिकाणी पोहोचले आहेत. रितेश देशमुख, भूषण कुमार, साजिद खान, आर बाल्की, रमेश तौरानी हे कलाकारसुद्धा अक्षयच्या दु:खात सहभागी झाले आहेत.

हेही वाचा: अक्षय कुमारला मातृशोक, अरुणा भाटिया यांचं निधन

आईच्या निधनानंतर अक्षय कुमारची पोस्ट-

'ती माझं सर्वस्व होती आणि आज तिच्या जाण्याने मला अत्यंत दु:ख झाले आहे. माझी आई अरुणा भाटियाने आज सकाळी हे जग सोडलं. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. या कठीण काळात तुम्ही केलेल्या प्रार्थनांचा मी आदर करतो', अशी पोस्ट अक्षयने लिहिली आहे.


आगामी चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त अक्षय युकेला गेला होता. मात्र आईची तब्येत बिघडल्याने सोमवारी तो मुंबईला परतला. २०१५ मध्ये 'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत अक्षय आईसोबतच्या नात्याबद्दल व्यक्त झाला होता. "आई आणि तिच्या मुलाचे बंधन मजबूत असले तरी ते तितकेच नाजूक असते. आम्हा दोघांमध्ये कोणतीच गोष्ट येऊ शकत नाही. आमच्यात कितीही मैलांचं अंतर असलं, दररोज संपर्कात राहू शकलो नसलो तरी तिच्याशिवाय माझं अस्तित्व काहीच नाही, मी कोणीही नाही", असं तो म्हणाला होता.

loading image
go to top