अक्षया देवधर म्हणतेय, तुम बस हात थामे रखना.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akshaya Deodhar share video for Hardik Joshi after Engagement

अक्षया देवधर म्हणतेय, तुम बस हात थामे रखना..

झी मराठी वरील 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री अक्षया देवधर आणि (akshaya deodhar) अभिनेता हार्दिक जोशी (hardeek joshi) यांनी खऱ्या जीवनातही एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर साखरपुडा केला. त्यांनी साकारलेल्या राणा आणि अंजली या पात्रांवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केलं. मालिकेनं निरोप घेतल्यानंतरही दोघं चर्चेत होते. पण त्यांनी त्यांच्या प्रेमाबाबत गोपनियता बाळगली गेली होती. साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत दोघांनी चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. आता अक्षयाने हार्दिकसाठी एक सुंदर व्हिडिओ तिच्या instagram अकाऊंट वकरून शेयर केला आहे. ( Akshaya Deodhar share video for Hardeek Joshi after Engagement)

हेही वाचा: १०० दिवसांनी परतलं प्रियंका चोप्राचं बाळ.. रुग्णालयातील ते दिवस..

साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच तिने हार्दिक सोबत एक रोमॅंटिक व्हाडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ तिने खास हार्दिकसाठी तयार केला आहे. यामध्य अक्षयाने 'तुझ्यात जीव रंगला' (tuzyat jeev rangla) या मालिकेपासून त्यांच्या साखरपुड्यापर्यंतचे अनेक फोटो एकत्र केले आहेत. या फोटोच्या व्हिडिओला तिने 'तुम बस हात थामे रखना', (tum bas hat thame rakhana) हे गाणे बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून वापरल आहे. या दोघांचा हा रोमॅटिक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

अक्षया आणि हार्दिकने पहिल्यांदा 'झी मराठी' वरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेत एकत्र काम केलं होतं. त्यांनी साकारलेल्या अंजली बाई आणि राणादा या जोडीला खूप लोकप्रियता मिळाली. ते खऱ्या आयुष्यात एकत्र येतील असे कुणाला वाटले नव्हते. पण त्यांच्या साखरपुड्याचे फोटो पाहून चाहत्यांना आनंद झाला. लवकरच ते विवाह बंधनात अडकणार आहेत.

Web Title: Akshaya Deodhar Share Video For Hardeek Joshi After Engagement

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top